आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Do Not Send Children Under 12 To School Until Corona's Medicine Arrives, Petition The Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनात शाळा:कोरोनाची लस येईपर्यंत 12 वर्षांखालील मुलांना शाळेत पाठवू नका, न्यायालयात याचिका दाखल

कोलकाता9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे कोरोनाचा धोका जास्त

कोरोना महामारीचा दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसची लस आतापर्यंत शोधली गेली नाही, तरीदेखील देशातील लॉकडाउन शिथील करण्यात आले आहे. यातच अनेक राज्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. हा कोरोनाचा धोका लक्षात घेता 12 वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस येईपर्यंत शाळेत पाठवले जाऊ नये, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

प्रियांका तिब्रेवाल नावाच्या एका वकील महिलेने 12 वर्षांखालच्या मुलांनी कोरोनाची लस येईपर्यंत शाळेत जाऊ नये यासाठी कोलकाता उच्च न्यायायालयात याचिका दाखल केली आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे मुलांना विषाणूचे संक्रमण होण्याचा जास्त धोका आहे. यामुळेच, मुलांना कोरोनाची लस येईपर्यंत शाळेत पाठवू नये, असे या महिलेचे म्हणने आहे. याबाबत कोलकाता हायकोर्टातल्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याबाबत बाजू मांडण्यास सांगितले आहे.पुढच्या आठवड्यात या प्रकरणी पुढची सुनावणी होईल. 

बातम्या आणखी आहेत...