आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान:डॉक्टरने वृद्धाला केले मृत घाेषित; मुलगी रडल्यावर दीड तासाने जिवंत

बिकानेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृत म्हणून लॅब टेक्निशियनने सांगितले

ऑक्सिजन कमी झाल्याने राजस्थानच्या रुग्णालयात दाखल केलेल्या भंवरसिंग चाैहान (७०) या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने मृत्यू प्रमाणपत्र तयार करून मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्याची तयारी सुरू केली हाेती. त्याच वेळी अचानक रुग्णाचा श्वासोच्छ‌्वास सुरू झाला.

वृद्धेची माेठी मुलगी शरीराला बिलगून रडू लागताचत्यांच्या शरीरात हालचाल सुरू झाली. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा नाडी,हृदयाचे ठाेके चालू होते. भंवरसिंग यांना ४ मे रोजी दाखल केले होते. दीड महिन्यापूर्वी त्यांच्यावर यकृताच्या कर्कराेगाची शस्त्रक्रिया झाली हाेती. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांची प्रकृती बिघडू लागली. डाॅक्टरांनी ईसीजी काढून प्राणवायूचे प्रमाण वाढवले. एक तासानंतर टेक्निशियनने त्यांना मृत जाहीर केले. टेक्निशयनशी बाेलून याबाबत चाैकशी करण्यात येईल, असे औषध विभागाचे अध्यक्ष डॉ. बी.के. गुप्ता यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...