आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Doctor Did Not Treat The Corona Suspect, Young Man Died, Family Threw Body In The River

कोरोनाची भीती:डॉक्टरने उपचारास नकार दिल्यानंतर तरुणाचा मृत्यू; कुटुंबियांनी कोरोनाच्या भीतीने मृतदेह नदीत फेकून दिला

सहरसा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील दुर्गापूर गावात डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील 22 वर्षीय दिलवर शुक्रवारी अचानक बेशुद्ध होऊन पडला. कुटुंबिय त्याला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांनी कोरोना संशयित असल्याचे समजून उपचार करण्यास नकार दिला. कुटुंबियांनी फोन करुन सरकारी अँम्बुलंस बोलवली, पण अँम्बुलंस पोहचण्यापूर्वीच दिलवरचा मृत्यू झाला.

यानंतर कुटुंबिय मृतदेहाला ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये टाकून झिटकिया घाटावर घेऊन गेले. तिथे 2 वर्षीय मुलाच्या हातांने मुखाग्नी देऊन कोरोनाच्या भीतीने मृतदेहाला नदीत टाकून दिले.

तरुण दिल्लीवरुन घरी परत आला होता

कुटुंबियांनी सांगितले की, दिलवर दिड महिन्यापूर्वी दिल्लीवरन आला होता. त्याची तब्येत आधीपासूनच खराब झाली होती. परंतू, गावातील लोकांनी म्हणने आहे की, दिलवरचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.