आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Doctor Quit Salary Of 18 Lakhs, Will Now Serve Free In Same Institute, Inspirational Decision Of Gujarat Doctors

समर्पण:डॉक्टरांनी 18 लाखांचा पगार सोडला, आता त्याच संस्थेत मोफत सेवा देणार, गुजरातच्या डॉक्टरांचा प्रेरणादायी निर्णय

जल्पेश कालेणा . सुरत (गुजरात)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील प्रख्यात डॉ. सन्मुख जोशी यांनी नि:स्वार्थ सेवेसाठी १८ लाख रुपये वार्षिक वेतन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते लोक समर्पण रक्तपेढीला सेवा देत राहतील. ते म्हणतात, ‘माझं वय ७६ आहे. कोरोनाच्या काळात अंत:प्रेरणा झाली की मी संस्थेतून पगार घेऊ नये. कारण आता पैशांची गरज नाही. या निर्णयामुळे घरातील सदस्यही खुश आहेत.’ डॉ. जोशी सांगतात, ‘या वयात मी मध्यरात्रीही जागतो. देशात कोणत्याही रुग्णालयात किंवा रक्तपेढीमध्ये रक्त किंवा नवीन रक्तगटासंबंधी समस्या असल्यास त्याचे नमुने माझ्याकडे येतात. ही जबाबदारी मी यापुढेही पार पाडणार आहे.’ दुसरीकडे, डॉ. जोशी यांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी रक्तपेढीने घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...