आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयुर्वेदिक पदव्युत्तर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. यासोबत विविध मागण्यांसाठी आज डॉक्टर आंदोलन करणार असून काही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कोरोना सेंटर आणि कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सेवा या संपातून वगळण्यात आल्या आहेत.
IMA ने पुकारलेल्या या संपात खासगी रुग्णालये, ओपीडी बंद राहणार आहेत. देशव्यापी संपादरम्यान ICU आणि CCU सेवा वगळता इतर अत्यावश्यक नसलेल्या सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच घेतलेल्या अपॉईंटमेंट आणि आज होणाऱ्या शस्त्रक्रियादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.
आयएमएने म्हटले आहे की 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्व डॉक्टर संपावर असतील. दरम्यान आयुर्वेद डॉक्टर सामान्य आणि ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया सोबतच नेत्र, कान, घसा शस्त्रक्रिया यांसह इतर 58 शस्त्रक्रिया देखील करू शकतील असे काही दिवसांपूर्वी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (CCIM) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.