आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Doctors In Kerala, Fatigue Of Health Workers, Mentality Of Quitting Jobs; Increasing Infection Anxiety In The Second Wave; News And Live Updates

कोरोनाची दुसरी लाट:केरळमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना थकवा, नोकरी सोडण्याची मानसिकता; दुसऱ्या लाटेत वाढता संसर्ग चिंता वाढवणारा

कोची2 महिन्यांपूर्वीलेखक: रामकुमार आर.
  • कॉपी लिंक
  • केरळच्या सर्व क्षेत्रांचे नुकसान, दीड लाख कोटी रुपयांचा फटका

केरळने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वी मुकाबला केला होता. राज्याच्या कोरोना नियंत्रण मॉडेलचे जगभर कौतुकही झाले होते. परंतु आता दुसऱ्या लाटेत कोरोना नियंत्रणासाठी संघर्ष करणाऱ्या केरळातील चित्र वेगळे आहे. देशातील एकूण नव्या कोरोना रुग्णांपैकी निम्म्यावर केरळमध्ये आढळून येत आहेत. राज्यात सलग सात दिवसांपासून २० हजारांहून जास्त रुग्ण आढळत आहेत. राज्याच्या संसर्गाचा दर वाढून १३.६१ टक्के झाला आहे. तो देशात सर्वाधिक आहे.

सरकारी आकडेवारीनुसार जूनच्या अखेरच्या आठवड्यात केरळमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रमाणात ९.४४ अशी घट झाली होती. संख्या कमी होऊन ती ८ हजारांवर आली होती. परंतु केरळवर दुसऱ्या लाटेचे सावट होते. नव्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत होती. त्यानंतर २८ जुलै रोजी २२ हजार १२९ व २९ जुलैला २४ हजार ६४ नवे रुग्ण आढळून आले. आता केरळमध्ये वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे. केंद्राची सहासदस्यीय टीमही केरळमध्ये आहे. ही टीम संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देईल. दीर्घकाळ रुग्ण वाढले तर कोरोनाच्या म्युटेशनची शंका वाढू लागेल. राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, मार्चनंतर केरळमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव वाढला.

उच्च लसीकरण दर व चांगल्या निगराणीमुळे या व्हेरिएंटशी मुकाबला करता येत आहे. संसर्गाचा दर कमी असल्यावर लोक नियमांचे पालन कमी करतात. त्यामुळे परिस्थिती पुन्हा बिघडते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार ३९.९० टक्के लोकांना कोरोनाचा किमान एक डोस देण्यात आला आहे. १६ टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. राज्यातील आरोग्य सेवा पार कोलमडली आहे. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ एन.एम. अरुण म्हणाले, रुग्णालयांत व्यवस्था राहिलेली नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांना शारीरिक तसेच मानसिक थकवा जाणवू लागला आहे.

बहुतांश रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर रुग्णांवरील उपचारदेखील कठीण होत चालला आहे. त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ डॉक्टर म्हणाले, आम्ही पूर्णपणे थकलो आहोत. तणावग्रस्त आहोत. माझे अनेक सहकारी तर नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत. आमच्या खासगी व कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. परंतु त्यास वरिष्ठ अधिकारी दोषी ठरतात.

केरळच्या सर्व क्षेत्रांचे नुकसान, दीड लाख कोटी रुपयांचा फटका
केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल म्हणाले, लॉकडाऊनचा २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत फटका बसला. राज्याच्या आर्थिक क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम दिसला. पर्यटन, कृषीसारख्या क्षेत्रांना गती देण्यासाठी योजना तयार करत आहे. केरळच्या अर्थव्यवस्थेला २०२०-२१ मध्ये १,५६,०४१ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अर्थशास्त्रज्ञ राहुल नांबियार म्हणाले, उद्योग व रोजगाराच्या क्षेत्रात ५० ते ८० टक्क्यापर्यंत नुकसान झाले. बहुतांश क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले. कोरोनाच्या अगोदर केरळमध्ये सुमारे ६ ते ७ लाख स्थलांतरित मजूर होते. ते मूळ राज्यात गेले होते. ते परतले नाहीत. कोचीचे एका शिकाऱ्याचे प्रमुख म्हणाले, अनलॉकनंतर उद्योगांनी गती घेतली. परंतु पर्यटकांनी पाठ फिरवली. कारण रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...