आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Doctors Performed Normal Delivery Of A Corona Suspicious Women In Isolation Ward

सुरत:डॉक्टरांनी आयसोलेशन वॉर्डमध्ये कोरोना संशयित महिलेची केली सामान्य प्रसूती

सुरत3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गर्भवती महिलेवर कोरोना पॉझिटिव्हप्रमाणे डॉक्टर करत होते उपचार
  • कोरोना संशयित आणि ८ महिन्यांची होती गर्भवती

कोरोना संशयित व साडेआठ महिन्यांच्या गर्भवती महिलेची सुरत येथे सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये नॉर्मल प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर आई व बाळाचे नमुने घेण्यात आले व तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले. दोघांचेही रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत. बाळ व बाळंतीण दोघांची प्रकृती चांगली आहे. बाळावर एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले, लिंबायत गावातील एक ३४ वर्षीय महिला साडेआठ महिन्यांची गर्भवती होती. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेने तिला सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तिच्यावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू होते. रुग्ण संशयित असल्याने  सर्व प्रकारचे उपचार पॉझटिव्ह रुग्णांप्रमाणेच केले जातात. यासाठी आयसोलेशन वॉर्डात प्रसूती विभागाच्या डॉक्टरांनी प्रसूती केली. 

दुसरी घटना : प्रसूतीवेदनेनंतर रुग्णवाहिकेत केली प्रसूती

सुरत : १०८ रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी एका महिलेची प्रसूती केली. सुरतमधील हजिराजवळील भट्टलाई गावातील अर्चना राजपूत(२४) या तरुणीस रात्री उशिरा प्रसूतीवेदना सुरू झाल्या. मंगळवारी सकाळी १० वाजता पती रामसेवक यांनी १०८ रुग्णवाहिकेस फोन करून माहिती कळवली. १०८ रुग्णवाहिकेतील इएमटी मनोहर राठोड व चालक अतिक शेख घटनास्थळी येऊन अर्चनाला रुग्णालयाकडे घेऊन जात होते. परंतु, वाटेत तिला वेदना असह्य होत असल्याने दोघांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रुग्णवाहिकेतच तिची नॉर्मल प्रसूती करवली. अर्चनाचे पती एलअँडटी कंपनीत नोकरीस आहेत. ते मूळचे राजस्थानी आहेत. रामसेवक यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पत्नीची ही तिसरी प्रसूती होती. आई व नवजात बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...