आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिहारमधील जमुईत गिद्धौर विभागातील दिग्विजय सिंह सार्वजनिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. रामस्वरूप चौधरी (६३) यांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी एका खोलीत पंख्याला लटकून जीव दिला. सकाळी बराच वेळ त्यांनी त्यांचे सहकारी आणि विभागातील लोकांशी फोनवरून बातचीत केल्याचे सांगितले जाते. यानंतर चहा, नाष्टा करून रुग्णालयात जाण्यासाठी तयारी करायला ते त्यांच्या खोलीत गेले. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांचा चालक ओमप्रकाश रावत त्यांच्या निवासस्थानी आला होता आणि ते बाहेर येण्याची प्रतीक्षा करत होता. ते खोलीतून बाहेर न आल्याने चालक डॉक्टरची पत्नी आणि मुलांसोबत त्यांच्या खोलीजवळ गेला. खोलीचे दार आतून बंद होते. दरवाजा तोडून ते आत गेले असता प्रभारी वैद्यकीय अधिकारी पंख्याला लटकलेले होते. त्यांच्याजवळ एक सुसाइड नोटही सापडली आहे. सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, कोरोना झाल्यानंतर स्मरणशक्ती काम करत नाहीये, झोपही लागत नाही, वेड्यासारखे वाटत आहे, यामुळे मी जीव देत आहे.
मागील सहा वर्षांपासून होते गिद्धौरचे प्रभारी
सिंघपूर गावाचे डॉ. रामस्वरूप चौधरी सहा वर्षांपासून सीएचसी गिद्धौरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी कोरोना काळात त्यांना कोविड केअर केंद्राचीही जबाबदारी देण्यात आली होती. या वेळी त्यांनाही कोरोना झाला. तेव्हापासूनच ते कामाबाबत त्रस्त राहू लागले. १५ दिवसांपूर्वी त्यांना डीआयओचा (जिल्हा लसीकरण अधिकारी) पदभार देण्यात आला होता. दरम्यान, एसपी प्रमोद मंडल यांनी सांगितले की, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.