आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लखनऊ:डाॅक्टरांना 10 वर्षे नाेकरी सक्तीची, नाेकरी साेडल्यास 1 काेटींचा दंड, याेगी सरकारचे नवे आदेश

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी डाॅक्टरांसाठी नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर डाॅक्टरांना किमान १० वर्षे सरकारी रुग्णालयांत नाेकरी करावी लागेल. या दरम्यान काेणाला नाेकरी साेडायची असल्यास त्यांना १ काेटी रुपये दंड म्हणून भरावे लागतील. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डाॅक्टरांना लगेच नाेकरीवर रुजू व्हावे लागेल. त्याशिवाय पदव्युत्तर पदवीनंतर सरकारी डाॅक्टरांच्या सिनियर रेसिडेन्सीमध्ये उतरणे इत्यादीला परवानगी नाही. यासंबंधी एनआेसी प्रमाणपत्राची मागणी केली जाणार नाही. हा अभ्यासक्रम मध्येच साेडल्यास त्याच्यावर तीन वर्षांची बंदी लागू केली जाईल. या काळात विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घेता येणार नाही.

तुटवडा जाणवल्याने निर्णय : उत्तर प्रदेशात गाव-खेड्यापर्यंत प्राथमिक आराेग्य केंद्र, सामुदायिक आराेग्य केंद्र सुरू आहेत. परंतु या केंद्रावर डाॅक्टरांचा तुटवडा आहे. काही फार्मासिस्ट तर काही कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालू आहेत. त्याशिवाय जिल्हास्तरीय रुग्णालयांतही डाॅक्टरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नेहमीच डाॅक्टरांची सेवा मिळत नसलेल्यांनाही सेवा उपलब्ध हाेणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser