आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका वासनांध वृद्धाने स्वतःकडील पाळीव कुत्र्यावर बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी वृद्धाविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
कोलकात्यातील घटना
याविषयी सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील सोनारपूरमधील चौहाती पायराबन भागात राहणारा रतिकांत सरदार नावााच 60 वर्षीय व्यक्ती त्याच्याच पाळीव कुत्र्यावर बलात्कार करत होता. रतिकांत कुत्र्यावर अतिप्रसंग करत असल्याची माहिती शेजाऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्याला समजावून सांगत कुत्र्याला सोडून द्यायला सांगितले. मात्र रतिकांतने शेजाऱ्यांचे ऐकले नाही. गेल्या दोन वर्षांपासून तो कुत्र्यावर बलात्कार करत होता. अनेकदा समजावल्यानंतरही रतिकांत ऐकत नसल्याने अखेरिस शेजाऱ्यांनी तो कुत्र्यावर बलात्कार करतानाचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तक्रार
रतिकांत कुत्र्यावर बलात्कार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका प्राणीमित्र संघटनेने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून रतिकांतविरोधात गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिकांनी पोलिसांना सांगितल्यानुसार, रतिकांत हा कुत्र्यावर दोन वर्षांपासून बलात्कार करत होता. अनेकांनी सातत्याने रतिकांतला समजावलं. मात्र त्याने शेजाऱ्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत सातत्याने हा प्रकार सुरूच ठेवला.
ही बातमीही वाचा...
गुन्हा:गोव्यात परदेशी महिलेवर चाकू हल्ला, हॉटेलचा बार टेंडरने डच पर्यटक महिलेशी गैरवर्तनही केले; अटक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.