आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकोट:दहा वर्ष ज्या श्वानांना दूध आणि बिस्कीट दिले, त्या श्वानांनीच सोनसाखळी चोरांपासून वाचवले

राजकोट18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात राज्यातील राजकोट येथे एका ६५ वर्षांच्या महिलेला भटक्या कुत्र्यांनी (श्वान) सोनसाखळी चोरांपासून वाचवले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेला सामोरे गेलेल्या गीताबा भट्टी यांनी दैनिक भास्करला सांगितले की, ज्या भटक्या श्वानांनी मला मदत केली, त्यांना मी गेल्या दहा वर्षांपासून रोज दूध आणि बिस्कीटे खाऊ घालत होते. या श्वानांनी ज्या पद्धतीने त्या चोरांना पळवले ते चित्र मी आजही विसरू शकत नाही.

गीताबा यांनी सांगितले की, बुधवार दि. २४ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता रोजच्याप्रमाणे जवळच असलेल्या एका ठिकाणी जाण्यासाठी मी निघाले होते. मी जेव्हा लिंबूवाडी येथून जात होते, तेव्हा एक व्यक्ती माझ्या जवळ आला. तो अॅक्टीव्हा गाडीवरून उतरून मैदानाच्या दिशेने जात होता. मात्र, एका क्षणात तो वळून माझ्या समोर उभा राहिला. माझा गळा दाबून गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न करू लागला. मी जोरात ओरडले. सकाळची वेळ असल्याने त्यावेळी माझ्या जवळपास कोणीही नव्हते. परंतु, त्याच ठिकाणी असलेले दोन कुत्रे तात्काळ माझ्या मदतीला धावून आले. ते सोनसाखळी चोरांवर जोरात भंुकू लागले. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे ते चोरटे घाबरले आणि त्यांनी पळ काढला. त्यांच्या मागे कुत्रे जोरात धावले.

बातम्या आणखी आहेत...