आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशांतर्गत हवाई प्रवास स्वस्त होणार:सामानाविना प्रवास करणाऱ्यांना तिकीटाच्या भाड्यात मिळणार सवलत, बुकिंगवेळी निवडावे लागेल ऑप्शन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • DGCA ने बेस फेअर आणि सर्व्हिसेज चार्जला वेगळे करण्याची मंजुरी दिली

देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवशांना सामान घेऊन न गेल्यास तिकीट भाड्यात सूट मिळणार आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (DGCA) ने शुक्रवारी याबाबत नोटिफिकेशन जारी केले. या सुविधेचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना तिकीट बुकींगवेळीच ऑपश्न निवडावे लागेल. हा नवीन नियम कधीपासून लागू होईल आणि तिकीटात किती सवलत मिळेल, याबाबत DGCA ने अद्याप सांगितले नाही.

केबिन बॅग प्रवास करणाऱ्यांना होईल फायदा

DGCA ने सांगितले की, जो प्रवासी सामानाशिवाय किंवा फक्त केबिन बॅगसोबत प्रवास करेल, त्याला तिकीटामध्ये सूट दिली जाईल. परंतु, केबिन बॅगचे वजन ठरलेल्या आकड्यापेक्षा जास्त नसावे. सध्या एक प्रवासी 7 किलो वजनाचा केबिन बॅग आणि 15 किलो वजनाचा चेक-इन बॅग घेऊन जाऊ सकतो. एक्स्ट्रा वजन असल्यास वेगळा चार्ज द्यावा लागतो.

बेसिक फेअर स्वस्त होण्याची शक्यता

किरायांबाबत मिळालेल्या फीडबॅकच्या आधारावर DGCA ने म्हटले की, तिकीटात सामील अनेक सर्व्हिसेस अशा आहेत, ज्यांची प्रवाशांना गरज नाही. अशा सर्व्हिसेस आणि याच्या चार्जेसला वेगळे केल्यावर बेसिक फेअर स्वस्त होण्याची शक्यता आहे. यासोबतच प्रवाशांना आपल्या गरजेनुसार सुविधा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल.

हे चार्ज बेस फेअरपासून वेगळे होतील

  • प्रेफरेंशियल सीटिंग (पसंतीचे सीट) चार्ज.
  • पाण्याव्यतिरिक्त मील, स्नॅक आणि ड्रिंक चार्ज.
  • एअरलाइन लाउंजला वापरण्याचा चार्ज.
  • स्पोर्ट्स इक्विपमेंट चार्ज.
  • म्यूजिकल इंस्ट्रूमेंट कॅरिज.
  • किमती बॅगसाठी विशेष फीस.
  • चेक-इन बॅगेज चार्ज.
बातम्या आणखी आहेत...