आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Domestic Cows Decline By 5.5%, Haryana Breed Declines By 4.15% To 1.9 Per Cent, But Exotic Breeds Increase

दिव्‍य मराठी विश्‍लेषण:देशी गायींमध्ये 5.5 % घट, हरियाणा प्रजातीचे प्रमाण 4.15% घटून 1.9 टक्के, पण परदेशी प्रजातीच्या गायींच्या संख्येत वाढ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशी गायींच्या संख्येत घट झाली आहे. ही घट ५.५ टक्के असल्याचे स्पष्ट झाले. २०१३ मध्ये झालेल्या १९ व्या पशुधन पाहणीत देशातील गोधनात ७९ टक्के देशी प्रजातीचा समावेश होता. २०१९ च्या २० व्या पशुधन पाहणीत देशी प्रजातीच्या गायींचे प्रमाण ७३.५ टक्क्यांवर आले. पशुधनात गायींच्या संख्येत घट झाली. १९ व्या पाहणीत गायी ३७.३ टक्के होत्या. २० व्या पाहणीत हे प्रमाण ३६ टक्क्यांवर आले आहे. पशू विभागाने गुरुवारी पशुधनाचा प्रजातवार अहवाल जाहीर केला आहे. त्यात ४१ देशी व ४ विदेशी प्रजातींच्या गोधनाची पाहणी केली आहे. १९ व्या पाहणीत ३७ देशी व ४ परदेशी प्रजातींची पाहणी झाली होती. १९ व्या पाहणीत हरियाणा प्रजातीच्या गायी संख्येच्या दृष्टीने पहिल्या स्थानी होत्या. एकूण गायींमध्ये हरियाणा प्रजातीचे प्रमाण ४.१५ टक्के होते. २० व्या पाहणीत त्यात घट होऊन ते केवळ १.९ टक्के एवढे राहिले. हरियाणा प्रजातींचे प्रमाण राज्यवार पुढीलप्रमाणे : उत्तर प्रदेश- ४१.५ टक्के गाय, हरियाणा-२०.६ टक्के, राजस्थान-८.०५ टक्के. गीर प्रजातींच्या गायींचे प्रमाण ४.८ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या पाहणीत गीर गायींचे प्रमाण ३.४ टक्के होत्या. सर्वाधिक गीर गायींचे प्रमाण पश्चिम बंगालमध्ये ३४.७ टक्के आहे. गुजरात-२५.६ टक्के, राजस्थान-१५.२ टक्के प्रमाण आहे. साहिवाल गायींचे प्रमाण सुमारे २२ टक्क्यांनी वाढले. ही प्रजाती पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ४४.२ टक्के, उत्तर प्रदेशात २८.७ टक्के, छत्तीसगड व बिहारमध्ये प्रत्येक ६ टक्क्यांहून जास्त आहे. पंजाबमध्ये केवळ १.५ टक्के आहे. आसाममधील लखिमी प्रजातीची गाय दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण गोधनात लखिमी गायीची भागीदारी ४.८ टक्के आहे.बिहार, झारखंडमध्ये आढळून येणारी नच्चोर प्रजातींच्या गायींची संख्या तीनपटीने वाढली आहे. .राजस्थानच्या राठी प्रजातीच्या गायींची संख्या ४ लाखांनी कमी झाली आहे.महाराष्ट्र, कर्नाटकातील खिल्लारी गायींची संख्या २० लाख १४ हजारांनी घटली.

म्हशींच्या संख्येत घट
पशुधनाच्या एकूण लोकसंख्येत म्हशींचे प्रमाण २१.२३ टक्क्यांहून २०.४ टक्के झाले. मुर्सा प्रजातीचे प्रमाण ४२ टक्के आहे. मेंढी-बकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण पशुधनात मेंढ्या १२.७ टक्क्यांनी वाढून १३.८ टक्के तर बकऱ्या २६.४ टक्क्यांहून २७.७ टक्के झाली. उंटाचे प्रमाण ०.०८ टक्के घटून ०.०५ टक्के एवढे राहिले.