आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी शनिवारी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर लाइव्ह होते. यादरम्यान त्यांनी नागरिक्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की ऑगस्ट-सप्टेंबरपूर्वीच आम्ही आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करणार आहोत. परंतू, विमान सेवा सुरू करण्यापूर्वी देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला जाईल. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्या तयार आहेत.
यावेळी त्यांनी सांगितले की आतापर्यंत 'वंदे भारत मिशन'अंतर्गत 25 हजार 465 भारतीयांना मायदेशात आणण्यात आले. मे महिन्याच्या शेवटपर्यंत हा आकडा 50 हजारांच्या आसपास पोहचेल. लॉकडाउनदरम्यान भारतातून 8 हजार लोकांना परदेशात पोहचवण्यात आले.
I often get a lot of queries regarding civil aviation operations in the country but it's humanly not possible to individually answer each one of them.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) May 23, 2020
I will be happy to address your questions during my Facebook Live session from 1300 hrs today.
Do join in. pic.twitter.com/38GaozjdXP
पुरी यांनी 20 मे रोजी ट्वीट करुन 25 मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याबाबत माहिती दिली होती. 21 मे रोजी याची डिटेल गाइडलाइंस जारी करण्यात आली होती. यासाठी 8 विमान कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे.
25 मे पासून 33% फ्लाइट सुरू होतील, चांगली बुकिंग झाली
पुरी यांनी पुढे सांगितले की, 25 मे पासून 33% देशांतर्गत विमाने सुरू होणार आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार पहिल्याच दिवशी जवळपास सर्व तिकीटांचे बुकींग झाले आहे. यावेळी पुरी म्हणाले की, लॉकडाउनदरम्यान मंत्रालयाने लाइफ लाइन उड्डाने सुरू केली होती. या मार्फत एक हजार टन मेडिकल उपकरणे आणि इत्यादी महत्वाच्या सेवांचा पुरवठा करण्यात आला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.