आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमान सेवा सुरु:1162 पैकी 630 उड्डाणे रद्द; कंपन्यांनी पूर्वसूचनाही दिली नाही, प्रवासी संतप्त

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंध्र प्रदेशात आज, प. बंगालमध्ये गुरुवारपासून सुरू होणार विमानसेवा
  • विदेशातून भारतीयांना आणणाऱ्या विमानात 10 दिवस मधल्या सीट भरण्यास सवलत

देशातील विमानतळांवर ६१ दिवसांंनंतर हालचाल दिसली. प. बंगाल आणि आंध्र प्रदेश वगळता सर्व राज्यांत देशांतर्गत विमाने सुरू झाली. पहिले उड्डाण पहाटे ४.४५ वाजता दिल्ली ते पुणे झाले. मुंबई विमानतळावरून सकाळी ६.४५ ला विमान पाटण्याकडे उडाले. मात्र, काही राज्यांनी मर्यादित उड्डाणांनाच परवानगी दिल्याने अनेक ६३० उड्डाणे रद्द झाली. ११६२ पैकी ५३२ उड्डाणे झाली, त्यातून ३९२३१ प्रवाशांनी प्रवास केला. उड्डाणे रद्दची सूचनाही विमान कंपन्यांनी दिली नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. विमानतळावर पोहोचल्यावरच त्यांना ही माहिती मिळाली. बहुतेक प्रवासी वैतागले होते. बहुतेक प्रवासी ६-७ तास आधीच पोहोचले होते. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमाने रात्री रद्द झाली. प्रणालीद्वारे आपोआप मेसेज जाताे. फोन नंबरमधील अडचणीमुळे मेसेज मिळाले नसतील.

कर्नाटकात क्वॉरंटाइनचा नियम मोडून घरी गेले केंद्रीय मंत्री गौडा

कोरोनाबाधित राज्यांतून येणाऱ्यांना ७ दिवस संस्थात्मक क्वॉरंटाइन होण्याचा नियम कर्नाटक सरकारने केला आहे. मात्र दिल्लीहून बंगळुरूत आलेले केंद्रीय मंत्री सदानंद गौडा क्वॉरंटाइन होण्याऐवजी विमानतळावरून निघून गेले. त्यानंतर ते म्हणाले की, विशेष पदावरील व्यक्तींना क्वॉरंटाइनच्या दिशानिर्देशात सूट देण्यात आली आहे.

दिल्लीत अडकलेला ५ वर्षांचा मुलगा एकटाच बंगळुरूत पोहोचला

बंगळुरू | लॉकडाऊनमुळे पाच वर्षांचा विहान दिल्लीत अडकला होता. स्पेशल कॅटेगरीचे तिकीट घेऊन विहान बंगळुरूच्या विमानतळावर पोहोचला. तेथे त्याची आई आली होती. तो उतरल्यानंतर विमानतळाने टि्वट केले की, घरी आपले स्वागत आहे, विहान. विहान फेब्रुवारीत सुटीसाठी आजी-आजोबांकडे दिल्लीत गेला होता. त्यानंतर लॉकडाऊनमुळे अडकला.

कोर्टाने केंद्राला फटकारले : तुम्हाला जनतेची नव्हे, फक्त एअर इंडियाची काळजी आहे

विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणणाऱ्या विमानात १० दिवस मधल्या सीटवर प्रवासी बसतील. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, १० दिवसांनंतर याबाबतचे बॉम्बे हायकोर्टाचे आदेश लक्षात घेऊन मधली आसने रिकामी ठेवावी लागतील. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सोमवारी ईदची सुटी असतानाही विशेष सुनावणी घेतली. कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले. केंद्राकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, ही आसने बुक झाली आहेत. त्या आसनांवरील प्रवाशांना मनाई केल्यास विदेशात अडकलेल्या बहुतांश लोकांना निम्म्या कुटुंबासह प्रवास करणे भाग पडेल. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, मधल्या आसनांवर प्रवासी बसवले तर संसर्ग होणार नाही असे आपण कसे म्हणू शकता? विमानातील प्रवाशास संसर्ग करायचा नाही, हे कोरोनाला माहीत आहे काय? लोक एकमेकांजवळ बसले तर संसर्ग होणारच. कोर्ट म्हणाले की, ते बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही.

बातम्या आणखी आहेत...