आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Domestic Flights After 62 Days| Domestic Flight Operations Resume First Flight From Delhi To Pune Took Off News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

62 दिवसांनंतर टेकऑफ:दिल्लीहून पहिले विमान पुण्याला पोहचले; प्रवासी म्हणाले - आम्ही प्रवासापूर्वी चिंताग्रस्त होतो, परंतु सर्वांनी सावधगिरी बाळगली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी खूप आनंदी आणि सतर्क दिसले - Divya Marathi
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी खूप आनंदी आणि सतर्क दिसले
  • दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून 380 देशांतर्गत उड्डाणांची तयारी
  • आंध्र प्रदेशात 26 मे आणि पश्चिम बंगालमध्ये 28 मेपासून होणार विमान सेवेला सुरूवात

देशात 62 दिवसांनंतर देशांतर्गत उड्डाणांना आजपासून सुरुवात झाली. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी पुण्यासाठी पहिेले विमान रवाना झाले आणि सकाळी 1.30 वाजता पोहचले. विमानातील प्रवाश्यांनी सांगितले- 'आम्ही प्रवासाआधी चिंताग्रस्त होतो, परंतु सर्व प्रवाश्यांनी सावधगिरी बाळगली. विमानात कमी प्रवासी होते. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशात आज सायंकाळपर्यंत हवाई सेवा पूर्ववत होईल.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारने 25 मार्चपासून देशांतर्गत प्रवासी उड्डाणे पूर्णपणे बंद केली होती. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणे 22 मार्चपासून बंद आहे. यादरम्यान मालवाहून आणि विशेष विमान वाहतून सुरू होती. 

प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद, फ्लाइट अटेंडंट म्हणाला - थोडे चिंतीत आहोत

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. सर्व प्रवासी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत होते. दिल्ली-पुणे विमानाचे फ्लाइट अटेंडंट अमनदीप कौर म्हणाले - आम्हाला पहिल्यांदाच कामावर येताना काळजी वाटत आहे. आम्हाला एअरलाइन्समधून पीपीई किट मिळेल.

पुण्यातून विमान सेवा सुरू

दिल्ली, चेन्नई, कोचीन, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरु, जयपूर, अहमदाबाद या शहरांसाठी विमानतळ प्रशासनाने विमान वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. विमान वाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने 22 मे रोजी दिलेल्या सूचनांची दखल घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकऱणाने सांगितल्यानुसार विमानतळावर तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली.

आज 1050 विमाने उड्डाण घेणार 

नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी रविवारी सांगितले की, 25 मे पासून आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता देशभरातील विमान सेवा सुरू होईल. आंध्रात 26 मे आणि बंगालमध्ये 28 मे पासून मर्यादित उड्डाणांना मंजूरी दिली जाईल. महाराष्ट्र आणि तमिळनाडूने देखील देशांतर्गत उड्डणांना विरोध दर्शवला होता. मात्र आता मंजुरी दिली आहे. उड्डयन मंत्रालयाच्या माहितीनुसार सोमवारी 1050 विमाने उड्डाण घेतील. 

पहिल्या आठवड्यात 8214 विमाने कार्यान्वित होणार आहेत. यात सर्वाधिक इंडिगोच्या 3632, स्पाइसजेटच्या 1403, गो एअरच्या 831, एअर इंडियाच्या 703, एअर एशियाच्या 610, विस्तारा 539, एलायन्स एअरच्या 309 फ्लाइट्सचा समावेश आहे. 

सर्व राज्यांकडून प्रवाश्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी 

देशांतर्गत उड्डाण सेवा सुरू होण्यापूर्वी सर्व राज्यांनी प्रवाश्यांसाठी कठोर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) निश्चित केली आहे. सर्व प्रवाश्यांची थर्मल स्क्रीनिंग होईल. त्यांना 14 दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...