आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा फटका:सणासुदीच्या तोंडावर घरगुती एलपीजी सिलिंडर 15 रुपयांनी महाग, पेट्रोल 30 तर डिझेल 35 पैशांनी वाढले

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत पुन्हा वाढली आहे. तेल कंपन्यांनी विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली आहे.

दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये
या वाढीनंतर आता राजधानी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 884.50 रुपयांवरून 899.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. तर 5 किलोचा सिलिंडर आता 502 रुपयांना मिळणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर 43.5 रुपयांपर्यंत वाढ केली होती.

पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले
पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले आहेत. दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 30 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 35 पैशांनी वाढ झाली आहे. यानंतर येथे पेट्रोल 102.94 आणि डिझेल 91.42 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. या महिन्यात पाचव्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...