आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती गॅसच्या दरात पुन्हा सिलिंडरमागे २५ रुपये वाढ केली. यामुळे दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर ७६९ रुपयांवरून ७९४ रुपये झाले. वाढीव दर २५ फेब्रुवारीपासूनच लागू झाला आहे. ही वाढ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसह अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरवर लागू असेल.
फेब्रुवारी महिन्यातील ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारीला २५ रुपये आणि १५ फेब्रुवारीला ५० रुपये वाढवण्यात आले होते. यामुळे एका महिन्यातच सिलिंडर १०० रुपये महाग झाला आहे. डिसेंबरनंतर त्यात १५० रुपये वाढ झाली. तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढत्या दरात मागणीचा पुरवठा करण्यासाठी गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते.
मोठ्या शहरांत अनुदान पूर्णपणे बंद : तेल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मेट्रो व मोठ्या शहरांत सिलिंडरवरील अनुदान बंद केले आहे. दिल्लीसारख्या शहरात सर्व ग्राहकांना पूर्ण किंमत द्यावी लागत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.