आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र सरकारने घरगुती उड्डाणांमध्ये 10 टक्के वाढ केली आहे. आता विमान सेवा 70% वरुन 80% झाली आहे. एव्हिएशन मिनिस्टर हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी म्हटले की, एअरलाइंस आपल्या प्री-कोविड कॅपेसिटीच्या हिशोबाने 80% फ्लाइट्स ऑपरेट करू शकतील. पुरी यांनी पुढे सांगितले की, 25 मे रोजी फक्त 30 हजार लोकांनी हवाई प्रवास केला होता. 30 नोव्हेंबरला हा आकडा 2.52 लाखांवर पोहचला. हा मागील महिन्यातील एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. यामुळेच विमानांची कॅपेसिटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डोमेस्टिक पॅसेंजरची संख्या सतत वाढत आहे
देशांतर्गत प्रवास करणाऱ्यां प्रवाशांची संख्या सतत वाढत आहे. यामुळेच केंद्र सरकारने एअरलाइंस कंपन्यांना 70% कॅपेसिटीसह उड्डाण घेण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी एव्हिएशन मिनिस्ट्रीने जूनमध्ये उड्डाणांची संख्या 45% वाढवण्याची परवानगी दिली होती.
2 सप्टेंबरला याला वाढून 60% करण्यात आले. याशिवाय मिनिस्ट्रीने ऑगस्टच्या अखेरपर्यंत एअरलाइन कंपन्यांसाठी अनेक सवलतींची घोषणा केली. यात प्रवाशांना जेवण आणि इतर सवलतींचा समावेश आहे. लॉकडाउननंतर 25 मेपासून देशांतर्गत प्रवासाची सुरुवात झाली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.