आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​domestic Violence Goes Viral On Instagram, Latest News And Update

वाढदिवस साजरा करणाऱ्या पत्नीला पतीची मारहाण:बंगळुरुतील घटनेची दिल्ली महिला आयोगाने घेतली दखल, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतो. पण कौटुंबिक हिंसाचाराच्या अशा घटनांना वाचा फोडण्यासाठी तो तुम्हाला दाखवणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

कर्नाटकातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी या घटनेप्रकरणी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोमई यांना पत्र लिहून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

व्हिडिओत दिसून येत आहे की, पीडित महिला आपल्या मुलासोबत वाढदिवस साजरा करत आहे. त्यावेळी आरोपी पती अचानक आपल्या जागेवरून उठून तिला बेदम मारहाण करतो. हे सर्वकाही त्यांच्या मुलापुढे घडते. आरोपी व्यक्ती महिलेला अनेकदा मारतो. पण ती त्याला कोणताही प्रतिकार करत नाही.

दिल्ली महिला आयोगाचा हस्तक्षेप

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक यूजर्सनी महिलेला पतीपासून विभक्त राहण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पतीवर कौटुंबिक हिंसाचाराची कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'या जनावराला तुरुंगात डांबले पाहिजे,' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तूर्त या पतीवर कोणतीही कारवाई झाली नाही.

घटस्फोटाला नकार दिल्यानंतर पुन्हा एकत्र

पीडित महिलेने आपल्या ताज्या व्हिडिओत आपली व्यथा मांडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ती गत काही वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. तिने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हाही दाखल केला होता. पण पतीवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याला अटकही झाली नाही. त्याने पीडितेला घटस्फोट देण्यास नकार दिला. त्यानंतर महिला व तिच्या कुटुंबीयांविरोधात मानहाणीचा गुन्हा दाखल केला.

या घटनाक्रमानंतर या जोडप्याने पुन्हा लग्न केले. आता त्यांना एक मुलगाही झाला आहे. मालीवाल यांनी पीडित महिला व तिच्या मुलाच्या योग्य समुपदेशनाचीही मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...