आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान श्रीलंका टीमचे फलंदाज सध्या आपल्या घरच्या मैदानावर काश्मीर विलाेपासून तयार केलेल्या बॅट्सच्या आधारे आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत धावांचा पाऊस पाडत आहेत. गतवर्षी आॅक्टाेबरमध्ये झालेल्या टी-२० च्या विश्वचषकातही याच बॅट्सच्या मदतीने फलंदाजांनी झंझावाती खेळी केली. त्यामुळेच सध्या काश्मीरमध्ये तयार करण्यात आलेल्या बॅट्सला जागतिक स्तरावरील मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. यातूनच या ठिकाणावरून दरवर्षी जवळपास १०० कोटींच्या बॅट्सची निर्यात केली जाते. येथील बॅट्सने सध्या आेमानसह श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब आमिरात, बहरीन आणि पाकिस्तानमधील मार्केटमध्येही आपला दबदबा निर्माण केला आहे. याच मार्केटमधील बॅट्सच्या आधारे या ठिकाणचे फलंदाज जागतिकस्तरावर तुफान फटकेबाजी करताना दिसत आहेत. त्यामुळे येथील मार्केटला जगाच्या कानाकोपऱ्यात आपली नवीन आेळख निर्माण करता आली.
दरवर्षी १०० कोटी बॅट्सची निर्यात; सहा देशांच्या खेळाडूंची खास मागणी
काश्मीर येथील बॅट्सला जगभरातून प्रचंड मागणी आहे. यातून सहा देशांतील संघांनी आपल्या खेळाडूंसाठी येथील बॅट्सची मागणी केली आहे. अफगाणिस्तान संघातील सहा क्रिकेटपटूंनी आमच्यासाेबत थेट बॅट्स मिळवण्यसाठी करार केला आहे. टी-२० सह वनडे व कसाेटी या तिन्ही फाॅरमॅटमधील सामन्यांदरम्यान येथीलच बॅट्सचा वापर केला जातो. त्यामुळे काश्मीरमधील हे मार्केट लाेकप्रिय झाले आहेे, अशी माहिती स्पोर्ट््स कंपनीचे मालक फैजुल कबीर यांनी दिली. त्यामुळे १०० कोटींपेक्षा अधिक बॅट्स निर्यात हाेतात.
काश्मीर निर्यात करणारे दुसरे माेठे मार्केट; ४०० कंपन्या, १ लाख वर्कर
काश्मीर हे जगभरात निर्यात करणारे दुसरे सर्वात माेठे मार्केट म्हणून आेळखले जात आहे. याठिकाणी ४०० पेक्षा अधिक कंपन्यांनी क्रीडा साहित्य निर्मितीची सुरुवात केली. त्यामुळे जवळपास १ लाखापेक्षा अधिक कारागीर काम करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.