आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dominica Court Rejects Mehul Chaksi's Bail Plea, Orders Explanation For Illegal Entry

पीएनबी कर्ज घोटाळ्यातील आरोपी:मेहुल चाेकसीचा जामीन अर्ज डॉमिनिका कोर्टाने फेटाळला, देशात बेकायदा घुसल्याबद्दल स्पष्टीकरण देण्याचे आदेश

नवी दिल्ली /सँटो डाेमिंगो16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएनबी कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याचा जामीन अर्ज डॉमिनिका कोर्टाने गुरुवारी फेटाळला. न्या. बर्नी स्टीफन्सन यांनी सांगितले, मायदेशातून पळालेल्या व्यावसायिकाने (चोकसी) आधी बेकायदा डॉमिनिकात घुसल्याच्या आरोपाला उत्तर द्यावे. हे प्रकरण डॉमिनिकातील कनिष्ठ न्यायालयात सुरू आहे.

दरम्यान, गुरुवारीच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चोकसीला भारतात आणण्यात कसर सोडणार नाही. त्याला आणण्याचे सर्व ते प्रयत्न सुरू राहतील. भारतीय नागरिक चोकसीवर पीएनबीत १३५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता. त्याने २०१७ मध्ये अँटिग्वा-बारबुडाचे नागरिकत्व घेतले. त्यानंतर २०१८ पासून तो तेथे राहत होता. मात्र २३ मे रोजी तो एक मैत्रिणीसोबत डॉमिनिकात गेला होता. तेथे त्याला भारतीय यंत्रणांच्या विनंतीवरून इंटरपोलने अटक केली होती. सध्या तो कैदेत आहे. चोकसीला डॉमिनिकातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...