आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Donate Blood Before Vaccination; Otherwise There Will Be A Shortage Of Oxygen; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर ग्राऊंड रिपोर्ट:लस घेण्याआधी रक्तदान करा; अन्यथा ऑक्सिजनप्रमाणेच भासेल तुटवडा; 4 राज्यांत केले जात आहे रक्त व प्लाझा देण्याचे आवाहन

जयपूर/चंदीगड/सिमला/अहमदाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणाआधी रक्तदान गरजेचे, मग 2 महिने देता येणार नाही

देशात पसरलेल्या कोरोना संसर्गादरम्यान अनेक राज्यांत गंभीर रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरू होणार आहे आणि तेच सर्वात जास्त दाते असल्याने ब्लड बँका काळजीत आहेत. यामुळे ब्लड बँक आणि रुग्णालयांत डॉक्टर रक्तदानाचे आवाहन करत आहेत. तज्ज्ञांनुसार अशा परिस्थितीत आगामी काळात रुग्णांना रक्ताच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, ऑक्सिजन सिलिंडरप्रमाणेच रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी गुजरातमध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. बडोद्यात जैन समाजाने अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. अहमदाबादसह इतर शहरांतही अशाच प्रकारे शिबिरे घेतली जात आहेत. सध्या इतर राज्यांत काय स्थिती आहे आणि त्यांची काय तयारी आहे, वाचा...

लसीकरणाआधी रक्तदान गरजेचे, मग २ महिने देता येणार नाही
सिमल्यातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे ब्लड बँक विभागाचे अध्यक्ष डॉ. संदीप मल्होत्रा यांचे म्हणणे आहे की, लस घेतल्यानंतर दोन ते अडीच महिने रक्त काढता येत नाही. कारण लसीनंतर काही दिवस रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते. डॉ. मल्होत्रा यांचे म्हणणे आहे की, जर लोकांनी लस घेण्याआधी रक्तदान केले तर गरजू विशेषत: थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही.

पंजाब - राज्यात रक्तदानात ७०% घट झाली आहे. सर्व ब्लड बँकांत दानाचे आवाहन केले जात आहे. डॉ. राकेश चोप्रा यांचे म्हणणे आहे की, आम्ही लसीकरणासाठी रक्तदानाचे आवाहन करत आहोत. तसेच प्लाझ्मा दानासाठीही मोहीम राबवली जात आहे.

गुजरात - बडोदे, राजकोट आणि अहमदाबादमध्ये टंचाई भासू नये म्हणून स्वयंसेवी संघटना आठवडाभराची मोहीम राबवून रक्त व प्लाझ्मा दान करून घेत आहेत. आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त तरुण सहभागी झाले.

हिमाचल - येथे सध्या राज्य सरकार, रक्तदान केंद्र किंवा स्वयंसेवी संस्थांनी रक्तदानासाठी कोणत्याही प्रकारे मोहीम सुरू केलेली नाही. सर्वांचे लक्ष लसीकरणाकडे आहे. मात्र, मेमध्ये राज्यातील अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहा रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची तयारी आहे.

राजस्थान - ब्लड बँकांमध्ये रक्ताची टंचाई अाहे. राजधानी जयपूरचे मुख्य रुग्णालय एसएमएससहित राज्यातील अनेक रुग्णालयांत तुटवडा जाणवत आहे. सध्या फक्त तातडीचे रुग्ण येत आहेत व त्यांच्यासाठी कसेतरी करून रक्तदान केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...