आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Don't Be Afraid Of Corona; Despite Having Cancer I Collect Sample Of All A Lab Technician

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणा:काेेराेनाला घाबरू नका; कॅन्सर असूनही मी सर्वांचे घेताेय सॅम्पल; टेस्टची भीती घालवण्यासाठी दिले स्वत:च्या आजाराचे उदाहरण

सुरतएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • स्वत:च्या आजारापेक्षा साेपवलेली जबाबदारी मानताेय महत्त्वाची; त्यामुळे राेजच्या चेकअपला मुकताे

मोईन शेख 

जगभरातील बाधितांच्या मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये काेराेनाबद्दल प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. अशात आता हेच लाेक भीतीमुळे स्वत:ची टेस्ट करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यांच्या मनात याविषयीची भीती अद्यापही कायम आहे. अशा लाेकांना सुरतमधील लॅब टेक्निशियन चेतन चाैहान हा प्रेरणादायी ठरत आहे. स्वत: कॅन्सरग्रस्त असलेला हा चेतन  आपल्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष करून लाेकांमध्ये काेराेनाबाबतची  चाचणीसाठीची जनजागृती करत आहे. या चाचणीबाबत मनात कुठल्याही प्रकारची भीती ठेवू नका. त्यामुळे याचा धाेका वेगाने वाढू शकताे, असे आवाहनही ताे सर्वांना करत आहे. यासाठी आपण स्वत: चार  वर्षांपासून कॅन्सरच्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. मात्र, अशाही कठीण परिस्थितीमध्ये आपण सर्वांचे सॅम्पल घेण्यासाठी मी सक्रिय अाहे, असेही ताे सर्वांना सांगताे.

  • पीपीई किटमध्ये श्वास घेताना हाेताेय त्रास

काळजीत कुटुंबीय; वाढवताेय मनाेबल

सध्याच्या गंभीर परिस्थितीमुळे चेतनचेक कुटंुबीय काळजीत आहे. मात्र, ताे सर्वांचे मनाेबल उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, सर्वांच्या सहकार्यातून मला माेठा आनंद मिळताे. त्यामुळेच मला ही सेवा अधिक आवडते. पीपीई किटमुळे मला श्वास घेताना त्रास हाेताे. तरीही मी हे सर्व टाळून जबाबदारी पार पाडताेय.

उपचारासाठी मुंबईला जावे लागते, मात्र नाही जाऊ शकत

चेतनला उपचारासाठी मुंबईला जावे लागते. वेळही मिळाली हाेती. मात्र, त्याने जाणे टाळले. ड्यूटीसाठी घेतलेल्या या निर्णयाने त्याच्यावर काैतुकाचा वर्षाव हाेत आहे.  

बातम्या आणखी आहेत...