आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये नको : ओम बिर्ला

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी धार्मिक भावना चिथावणारे वक्तव्य देणे टाळावे,असा सल्ला खासदारांना दिला आहे. ओम बिर्ला यांनी रविवारी लोकसभा सभापतिपदाची तीन वर्षे पूर्ण केली. रविवारी त्यांनी सांगितले की, राज्यघटनेत सर्व धर्म समान असल्यामुळे खासदारांनी कोणत्याही धर्माबाबत चिथावणीखोर वक्तव्य करणे टाळले पाहिजे. खासदारांनी प्रत्येक वेळी संसदेची प्रतिष्ठा आणि मर्यादा कायम राखली पाहिजे. आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात सभागृहाची सरासरी उत्पादकता १००% वर राहिली. बिर्ला म्हणाले, सदनाच्या १७ व्या लोकसभेत आतापर्यंत ८ सत्रांत जवळपास १ हजार तासांचे काम झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...