आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकोट कोरोना रुग्णालय आग:वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करू नका : सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या राजकोट येथील कोरोना रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या वेळी राज्य सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत जोरदार फटकारले.

सर्वाेच्च न्यायालय म्हणाले, तुम्ही वस्तुस्थिती लपवण्याचे प्रयत्न करू नका. पुढील सुनावणीच्या वेळी सर्व तथ्यांसह नवीन शपथपत्र दाखल करा. न्यायालयाने सांगितले की, तुम्ही (गुजरात सरकार) हिशेबाच्या दृष्टीने तर सर्व ठीक आहे. मात्र, तुमची बाजू तुमच्याच विद्युत अभियंत्याच्या अहवालाच्या बरोबर उलट आहे. त्यांनी रुग्णालयातील वायरिंगबाबत राज्य सरकारला इशारा दिला होता. न्यायालयाने गुजरात सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या चौकशी व इतर गोष्टींबाबत पूर्ण माहिती तुम्ही माहिती उपलब्ध करून द्या. यानंतर पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली.

सहा रुग्णांचा झाला होता मृत्यू: राजकोटच्या उदय शिवानंद रुग्णालयात शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी शॉर्टसर्किटने आग लागली होती. या दुर्घटनेत सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंतच्या चौकशीत रुग्णालय व्यवस्थापनाची हलगर्जी दिसून आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी साेमवारी सायंकाळी उशिरा गोकुल हेल्थकेअर नावाच्या कंपनीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश माेढा, त्यांचा मुलगा विशाल आणि संचालक तेजस करमता यांना अटक केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser