आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा हवामान नाराज राहणार असल्याचे दिसत आहे. एप्रिल ते मे महिन्यादरम्यान भीषण उष्णता जाणवू शकते. त्यानंतर जून-सप्टेंबरदरम्यान पाऊसही कमी होण्याचा अंदाज आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या मते, यंदा लाँग पीरियड अॅव्हरेजच्या (एलपीए) ९४% पाऊस शक्य आहे. म्हणजे सरासरीपेक्षा कमी. ९०-९६% सरासरीपेक्षा कमी, ९६-१०४% सरासरी आणि १०४-११०% सरासरीपेक्षा जास्त पाऊस मानला जातो. ११०% पेक्षा जास्त पावसाची शक्यता यंदा ०% आहे. ९०% पेक्षा कमी पाऊस दुष्काळाच्या श्रेणीत येतो. याची शक्यता या वेळी २०% पर्यंत आहे.
यंदा सरासरीपेक्षा ४०% कमी पाऊस होईल, अशी शक्यता आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे हवामान शास्त्रज्ञ केरेन हंट सांगतात, फेब्रुवारीत १२२ वर्षांचा विक्रम मोडणारी भीषण उष्णता पुढील काही आठवड्यांमध्ये अधिक परिणाम दाखवू शकते. यंदाची उष्णता सहन करणे माणसांसाठी आव्हान असेल. कारण भारतात वेट-बल्व टेम्परेचर (तापमान व आर्द्रतेच्या आधारे गणना करतात.) ३५ अंशांवर जाऊ शकते. हे तापमान माणसाच्या सहन करण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिविताला धोका तर आहेच, पण माती कोरडी पडल्यास शेतीवरही परिणाम होतो. कठोर माती पाणी शोषून घेत नाही. पावसाबाबतचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज लवकरच जाहीर होणार आहे.
कारण; अल-नीनोमुळे वाऱ्याची दिशा बदलणार
आता ला नीना संपला आहे. अल-नीनो वाढण्याची शक्यता आहे. यात समुद्राच्या पृष्ठभागावरील पाणी सरासरीपेक्षा ४-५ अंशांपर्यंत उष्ण होते व पूर्व ते पश्चिमेकडे वाहणारे वारे कमकुवत होतात. १९५० ते आतापर्यंत ९ वेळा अल-नीनोमुळे मान्सून कमकुवत राहिला. तर ला-नीनामध्ये समुद्राचे पाणी वेगाने थंड होते. यामुळे चांगला पाऊस होतो. - जतीन सिंह, एमडी, स्कायमेट
परिणाम; कमी पावसामुळे शेती उत्पादनही कमी होणार
- ७०-८०% शेतकरी सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कमी पावसामुळे उत्पादन कमी होईल. परिणामी महागाई वाढेल.
- देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषीचा वाटा १८% आहे. त्यावरही परिणाम होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.