आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Double Mutant Coronavirus Variant; What Is? And Why Is So Dangerous? Maharashtra America UK, Singapore COVID Cases; News And Live Updates

दिव्य मराठी एक्सप्लेनर:कोरोना व्हायरसमधील डबल म्यूटेशन व्हेरिएंट रुग्णसंख्या वाढीसाठी जबाबदार; देशातील 10 पेक्षा जास्त राज्यात सक्रीय

9 महिन्यांपूर्वीलेखक: रवींद्र भजनी
  • कॉपी लिंक
  • जगातील अमेरिका, यूके, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये या व्हायरसचा शिरकाव झाला आहे.

भारत देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सक्रीय रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात चोवीस तासांत देशात 2.33 लाख नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अडीच पटीने जास्त असल्याचे वर्तवले जात आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये एका दिवसात सर्वात जास्त 97 हजार प्रकरणे समोर आले होते. शास्त्रज्ञ आणि तज्ञांमध्ये या गोष्टीची चर्चा सुरु असून देशात कोरोनाचे सक्रीय रुग्ण का वाढत आहे यावर विचारमंथन सुरु आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, देशातील रुग्ण वाढीस जगात आलेला नवीन व्हॅरिएंट आणि भारतातील डबल म्यूटेशन व्हायरस जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अवहालानुसार, महाराष्ट्र राज्यातील 61% नमुन्यात जीनोम सीक्वेंसिंगमध्ये डबल म्यूटेशन व्हायरस असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशात कोरोना व्हायरसचा प्रसार होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या मते, देशात डबल म्यूटेशन व्हायरस सर्वात आधी महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यात आढळले होते. त्यानंतर त्याचा प्रसार देशात झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात आढळला डबल म्यूटेशन व्हायरस
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या सर्वात जास्त सक्रीय रुग्ण आढळून येत आहे. नवीन सक्रीय रुग्ण येण्याच्या बाबतीत राज्य सध्या देशात पहिल्या नंबरवर आहे. महाराष्ट्र राज्यात जानेवारी ते मार्च महिन्यातील 361 सक्रीय रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले. दरम्यान, त्यामध्ये जीनोम सीक्वेंसिंग केले असता 220 नमुन्यात डबल म्यूटेशन व्हायरस आढळले होते. हे व्हायरस आता राज्यातील अमरावती, अकोला, पुणे, नागपूर, वर्धा, ठाणे, औरंगाबाद आदी जिल्हात आढळून आले आहे.

जगातील या देशात डबल म्यूटेशन व्हेरिएंटचा शिरकाव
कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटेशनमुळे सक्रीय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याची तीवत्रा गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. जगातील अमेरिका, यूके, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये या व्हायरसचा शिरकाव झाला आहे.

म्युटेशन काय आहे?
विषाणूचे म्युटेट (परिवर्तन) होणे एक स्वाभाविक प्रक्रिया असते. सर्वत्र सहजपणे फैलाव व्हावा यासाठी विषाणू स्वत:मध्ये असा बदल करून घेतो. त्यातून तो लोकांना बाधित करू शकतो. कोरोनाचा विषाणूही तेच करत आहे. कोरोना विषाणू महिन्यातून दोन वेळा बदल करत आहे. इन्फ्लूएंझाचा विषाणू सरासरी दुपटीने बदल करतो. कोरोना विषाणूत सुरुवातीचे परिवर्तन D614G असे होते.

याला डबल म्यूटेशन व्हेरिएंट का म्हणतात?
ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील सूक्ष्मजीवशास्त्रचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग म्हणतात की, जर एखादा विषाणू एका शरीरातून दुसर्‍या शरीरात गेला तर त्यात बदल होतात. हे बदल शब्दलेखन चुकीच्या शब्दांसारखे असतात. VIRUS वर VIURS लिहिण्यासारखे होत असून हे त्या व्हायरसचे रूप आहेत.

कोरोना व्हायरस म्हणजेच SARS-CoV-2 मध्ये दोन म्यूटेशन ( E484Q आणि L452R)असल्यामुळे त्याला डबल म्यूटेशन व्हायरस म्हणतात. शास्त्रज्ञांनी याला B.1.617 हे नाव दिले आहे.

जाणून घेऊ नवा व्हेरिएंट, महामारीवर त्याचा परिणाम
कोरोनाच्या नव्या रूपाची ओळख पटली नाही, असा संशोधकांचा एकही आठवडा गेला नसावा. आतापर्यंत ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेत व्हेरिएंटची चर्चा आहे. जाणून घेऊया या स्वरूपाबद्दल...

जगभरातील किती म्युटेशन आहेत?
N501Y यास नेली म्हणून आेळखले जाते. वेगाने पसरणारा B117 या 501YV1 व्हेरिएंट पहिल्यांदा केंटमध्ये आढळला. B1351 किंवा 501YV2 पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळला. P1 किंवा 501YV3 व्हेरिएंट पहिल्यांदा ब्राझीलमध्ये आढळला. आतापर्यंतच्या सर्वात चिंताजनक म्युटेशनपैकी E484K किंवा एक आहे. तो स्पाइक प्रोटीनमध्येही बदल करतो.

बातम्या आणखी आहेत...