आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Dr. Cyber Attack On Reddy's Lab; The Company Is Testing The Russian Vaccine In India, Closing All Data Centers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:डाॅ. रेड्डीज लॅबवर सायबर हल्ला; सर्व डेटा केंद्रे बंद, भारतात रशियन लसीची चाचणी घेत आहे कंपनी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राझीलमध्ये सुरू राहणार अॅस्ट्राझेनेकाची चाचणी

भारतात ‘स्पुटनिक -५’ या रशियातील लसीची चाचणी घेत असलेल्या डाॅ. रेड्डीज लॅबने सायबर हल्ल्यानंतर आपली सर्व डेटा केंद्रे बंद केली आहेत. सायबर हल्ल्याची खातरमजा झाल्यानंतर बचावात्मक उपाययोजना करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे कंपनीने सांगितले.

आमच्या सर्व सेवा २४ तासांत सुरू होतील, हल्ल्याचा कामकाजावर कोणताही गंभीर परिणाम हाेणार नाही, असे कंपनीचे सीडीओ मुकेश राठी यांनी म्हणाले. डाॅ. रेड्डीज लॅबला १७ आॅक्टाेबरलाच आैषध नियंत्रकांकडून स्पुटनिक-५ लसीची भारतात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी मिळाली हाेती.

ब्राझीलमध्ये सुरू राहणार अॅस्ट्राझेनेकाची चाचणी
रिआे दि जानेरिआे | ब्राझीलमध्ये एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यानंतरही अॅस्ट्राझेनेका या ब्रिटिश- स्वीडिश कंपनीची चाचणी सुरू राहणार आहे. वाॅल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार ऑक्सफर्ड विद्यापीठाने ब्राझील प्रकरणाचे मूल्यांकन केले.