आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना रुग्णांची संख्या कमी झालीये म्हणून लोकांनी हलगर्जीपणा करू नये, ही सूचना दिल्ली AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये रविवार 'इंडियाज फाइट अगेंस्ट द कोव्हिड' सेशनमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्यामुळे आता अजूनच काळजी करण्याची गरज आहे.
अँटीबॉडी पॉवरफुल नाही
डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, ‘कोरोना संपलेला नाही. व्हॅक्सीन दिल्यानंतरही कोरोनाचा काही अंश शरीरात राहू शकतो. त्यामुळे मास्कसोबतच स्वच्छता, सोशल डिस्टेंसिंग, आयसोलेशनसारख्या कोरोना नियमांचे पालन केलेच पाहीजे. ब्राझीलमध्ये 70% लोकांचा कोरोना बरा झाला होता, पण काही दिवसानंतर परत त्यांना कोरोना झाला. कारण, या आधी शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी नवीन स्ट्रेनशी फाइट करण्यास सक्षम नाहीत.’
लोक व्हॅक्सीनबाबत जागरुक नाही
फेस्टिव्हलमध्ये सायंटिस्ट आणि रिसर्चर गगनदीप कांगदेखील आले होते. यावेळी ते म्हणाले की, व्हॅक्सीनबाबत आधीपासूनच लोकांच्या मनात शंका येत आली आहे. पोलियोबाबतही लोकांच्या मनात शंका होती. सध्या लोकांना व्हॅक्सीनचे महत्व माहित नाही. याचे कारण म्हणजे, कमी इन्फॉर्मेशन किंवा कोणतीच इन्फॉर्मेशन नसणे आहे.
40% ठरवू शकले नाही, व्हॅक्सीन घ्यायची का नाही
व्हॅक्सीनोलॉजी डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले की, 26 डिसेंबरपासून 4 जानेवारीपर्यं दिल्लीमध्ये सर्वे झाला होता. यात समोर आले की, 40% लोक लस घ्यायची का नाही, हे ठरवूच शकले नाहीत. ते म्हणाले की, त्याबाबत संपूर्ण माहिती दिल्यानंतरच लोक जागरुक होतील.
भारत पुन्हा जगातील टॉप-15 संक्रमित देशांच्या यादीत सामिल
कोरोनाविषयी काळजी वाढवणारे वृत्त आहे. देश पुन्हा एकदा जगातील टॉप 15 देशांच्या यादीत सामिल झाला आहे. या 15 देशांमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त प्रकरणे आहेत. म्हणजेच असे रुग्ण यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
भारत या यादीमध्ये 15 व्या क्रमांकावर आला आहे. 30 जानेवारीला पोर्तुगाल, इंडोनेशिया आणि आयरलँडला मागे टाकत 17 व्या नंबरवर पोहोचले होते. तेव्हा आशा होती की, लवकरच जगातील टॉप-20 संक्रमित देशांच्या यादीमधून बाहेर पडू शकतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. यामुळे भारत आता पुन्हा जगातील सर्वात संक्रमित देशांमध्ये सामिल झाला आहे.
अमेरिका, फ्रान्स आणि यूकेमध्येही परिस्थिती खराब
अॅक्टव्ह प्रकरणांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. येथे सध्या 92 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. फ्रान्समध्ये 32 लाख आणि यूकेमध्ये 16 लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या व्यतिरिक्त या यादीमध्ये ब्राझील, बेल्जियम, स्पेन, इटली, रशिया, मॅक्सिको, पोलँड, आयरलँड, इडोनेशिया, अर्जेटिना आणि भारताचाही समावेश आहे.
9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातही वाढल्या अॅक्टिव्ह केस
शनिवारी देशात 13 हजार 919 नवीन रुग्ण आढळले. 11 हजार 412 लोक बरे झाले आहेत आणि 89 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे ओव्हरऑल अॅक्टव्ह रुग्णांमध्ये 2486 ची वाढ झाली आहे. 9 राज्य आणि केंद्रशासित राज्य असे आहेत, जेथे बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, पुद्दूचेरी, त्रिपूरा आणि चंदीगडचा समावेश आहे.
आतापर्यंत 1.09 कोटी रुग्ण
देशात आतापर्यंत 1 कोटी 9 लाख 91 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 6 लाखांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. तर 1 लाख 56 हजार 339 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 42 हजार 691 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.