आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Dr Kafil Khan Released From Jail Following Court Order, Says Khan 'Thank You For Not Killing In Encounter'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुटकेनंतरची प्रतिक्रिया:'एन्काऊन्टरमध्ये मारलं नाही याबद्दल धन्यवाद! यूपी सरकार हट्टी लहान मुलांप्रमाणे वागते; सुटकेनंतर कफील खान यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या कफील यांना सोडण्यात आले त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली

अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर डॉक्टर कफील खान यांची मथुरा तुरुंगामधून सुटका करण्यात आली आहे. उच्च न्यायालयानं तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. यानंतर कफील खान यांच्या सुटकेचं नाट्यही रात्री उशिरापर्यंत रंगलं होतं. यानंतर डॉक्टर कफील खान यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. एन्काऊन्टरमध्ये मारलं नाही याबद्दल धन्यवाद असंही ते म्हणाले.

1 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गोविंद माथुर यांच्या खंडपीठानं कफील यांच्यावर योगी आदित्यनाथ सरकारकडून लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. या सुटकेनंतर डॉ. कफील खान यांनी न्यायपालिकेचे आभार मानले. यासोबतच योगी सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.

काय म्हणाले न्यायालय?
न्यायालयाने म्हटले की, 'कफील खान यांचे भाषण कोणत्याही अर्थानं द्वेषपूर्ण नव्हते. तसेच दंगल घडवून आणणारं नव्हतं. कफील खान यांच्या भाषणामुळे अलीगढमध्ये शांती व्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नसल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. असं म्हणत डॉ. खान यांच्यावरील रासुका रद्द करण्याचे तसेच त्यांच्या तत्काळ सुटकेचे आदेश सकाळीच न्यायालयाकडून दिले गेले. आदेशानंतर खान यांचे नातेवाईक त्यांच्या सुटकेसाठी मथुरा तुरुंगात दाखल झाले. मात्र अधिकाऱ्यांनी आदेश न मिळाल्याचं सांगत खान यांना सोडण्यास नकार दिला. यानंतर सायंकाळपर्यंत हे नाट्य रंगल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

काय म्हणाले डॉ. खान?
न्यायालयाचे आभार मानत डॉ. खान यांनी योगी सरकारवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'मी न्यायपालिकेने इतके चांगले आदेश दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी 138 कोटी देशवासियांचे आभार मानतो ज्यांनी संघर्षात मला साथ दिली' असं म्हणत सुटकेनंतर डॉ. कफील खान यांनी न्यायपालिकेचे आणि जनतेचे आभार मानले. तचे ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेश सरकारने माझ्यावर खोटा आरोप केले होते. तसेच कारण नसताना खटला भरून आठ महिने मला तुरुंगात डांबलं गेलं. तुरुंगातही मला पाच दिवसांपर्यंत जेवण - पाण्याशिवाय माझा छळ केला. तसेच 'मी उत्तर प्रदेश एसटीएफचे आभार मानतो की त्यांनी मुंबईहून मथुरा आणताना एन्काऊन्टरमध्ये मला मारलं नाही' असंही ते म्हणाले.