आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Dr. Kruti Agrawal From United States Said 3,000 Patients Are Coming Here Every Day, You Are Lucky That You Are There In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुभवाचे बोल:अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. कृती म्हणाल्या - येथे रोज 3 हजार रुग्ण येत आहेत, तुमचे नशीब चांगले आहे तुम्ही भारतात आहात 

भिलवाडाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : न्यूजर्सीत कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. कृतींनी सांगितली येथील परिस्थिती

अनिल चतुर्वेदी

डॉ. कृती अग्रवाल अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्या सांगतात की, अमेरिकेतील सध्याच्या स्थितीमुळे लोक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. रुग्णालयात येणारे बहुतांश लोक कोरोनाबाधित आहेत. अत्याधुनिक सुविधा असूनही अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. येथील डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी १८ ते २० तास दररोज काम करत आहेत. डॉ.कृती यांच्यानुसार, कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. केवळ न्यूजर्सीमध्येच दररोज तीन ते साडेतीन हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही शेकडो जणांचा मृत्यू होत आहे. 

रुग्णालयात काम करणाऱ्यांच्या जिवालाही धोका आहे. मात्र तरीही सर्वजण कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अाटोकाट प्रयत्न करत आहेत.

नशीबवान आहात की तुम्ही भारतामध्ये आहात... 

सुदैवाने तुम्ही भारतात आहात. तिथे स्थिती नियंत्रणात आहे. मात्र तरीही सर्वांनी घरातच थांबून कोरोनाला हरवावे. सोशल डिस्टन्सिंगला गांभीर्याने घेऊन याचे काटेकोरपणे पालन करावे. कृती यांचे वडील मुकेश अग्रवाल सांगतात, जेव्हाही मुलीशी चर्चा होते, तेव्हा अमेरिकेतील स्थिती बघून चिंता वाटते. मात्र दरवेळी मुलगी आम्हाला काळजी घेण्याचा आणि घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला अवश्य देते. त्यामुळेच अाम्ही नीट प्रकारची काळजी घेऊ शकलाे, असेही डाॅ. कृती यांनी सांगितले.

अहमदाबादेत एमबीबीएस; चंदिगडमध्ये लग्न... 

डॉ.कृती यांनी अहमदाबादमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर चंदिगडमधील रहिवासी लवीश अग्रवाल यांची भेट झाली. लवीश आधी न्यूजर्सीमध्ये इंजिनिअर होते. तीन वर्षांपूर्वी कृतीही लग्नानंतर न्यूजर्सीमध्ये स्थायिक झाल्या. यानंतर त्यांनी एक वर्ष वैद्यकीय अधिकाऱ्याचा अतिरिक्त कोर्स केला. 

बातम्या आणखी आहेत...