आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dr Nagesh Reddy Said New Methods Developed, 99% Success In Treatment Of 20,000 Patients: News And Live Updates

भास्कर इंटरव्ह्यू:नवी पद्धती विकसित, 20 हजार रुग्णांवरील उपचाराने 99% यश : रेड्डी; ही वेळ दाेषाराेप करण्याची नाही, सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येण्याची गरज

हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रॉलॉजीचे संस्थापक डॉ. रेड्डी यांचा विद्यमान कोविड उपचार पद्धतीवर सवाल

हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट अाॅफ गॅस्ट्राेएंट्राॅलाॅजीच्या (एअायजी) मते, काेविडच्या सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये सध्या परदेशी उपचार पद्धतीचा प्रभाव असून हा उपचार भारतीय वातावरणाशी मेळ खात नाही. त्यामुळे काेविडसाठी चार भागांमध्ये नवी उपचार पद्धती विकसित केली अाहे. पहिली पद्धत काेणत्या रुग्णाला भरती करण्याची गरज अाहे. दुसरी, गृह विलगीकरणामध्ये काेणाला ठेवता येऊ शकते. तिसरी म्हणजे काेणाला अाैषध अाणि इंजेक्शन देण्याची गरज अाहे व चाैथी मधुमेह व अन्य गंभीर अाजाराच्या रुग्णांना कसे हाताळावे. या उपचार पद्धतीच्या माध्यमातून एअायजीच्या ५२ डाॅक्टरांच्या पथकाने २०,००० काेविड रुग्णांवर उपचार केले. यातील ९९ टक्के रुग्ण बरे झाले अाहेत. एसएसजीचे संस्थापक व पद्मश्री-पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित डाॅ. नागेश रेड्डी यांच्याशी एम. एस. शंकर यांनी केलेली बातचित..

तिसऱ्या लाटेसाठी अाराेग्य यंत्रणा कितपत सज्ज अाहे ?
देशाची लोकसंख्या पाहता आम्ही कधीही असे म्हणू शकत नाही की आपण तयार आहोत. कुणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. माझा विश्वास आहे की आम्ही परिस्थिती हाताळू शकतो. माझा विश्वास आहे की जूनच्या अखेरीस संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो. सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन येणारी लाट कशी राेखता येईल याची एक रणनीती तयार केली पाहिजे.

कोविड उपचार पद्धत विकसित करण्याची प्रेरणा कशी मिळाली ?
सध्याच्या काेविडच्या उपचारात बरेचदा संभ्रम निर्माण हाेत असल्याने अाम्ही काेविड उपचार पद्धत विकसित करण्याचा निर्णय घेतला. सध्याची मेयाे क्लिनिक व एनअायएच उपचार पद्धती अमेरिकेची अाहे किंवा अापल्या एम्सची उपचार पद्धती. परंतु ही भारतीय रुग्णांसाठी साजेशी नाही ही प्रमुख समस्या अाहे. मी असे म्हणत आहे.

कारण, पाश्चिमात्य देशातील उपचार पद्धती भारतीय रुग्णांना किंवा परिस्थितीला अनुकूल नसते. तेथे ते स्टेरॉइड्स आणि प्रतिजैविक वापरतात. म्हणून आम्ही क्लिनिकल पुरावा आणि अनुभव यांच्या संयुक्त अाधारावर अापली स्वत:ची पद्धती विकसित करण्याचा निर्णय घेतला. या नव्या उपचार पद्धतीच्या अाधारावर अाम्ही अलीकडेच २० हजार रुग्णांवर उपचार केले असून त्यामध्या मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी दिसून अाले.

स्टेराॅइडचा जादा डाेस हे काळ्या वा पांढऱ्या बुरशीचे कारण अाहे का ?
होय, बऱ्याच प्रमाणात. अामच्या अभ्यासात तेच दिसून अाले. अशा प्रकारचा संसर्ग मधुमेही रुग्णांमध्ये बघायला मिळताे. परंतु सर्वच प्रकरणात हे गरजेचे नाही. कारण, ते घाणीवर अवलंबून असते. रुग्णाचा अाॅक्सिजन मास्क अाणि ट्यूबची अदलाबदल हेही कारण असू शकते.

या उपचार पद्धतीचे पेटंट तुम्ही घेणार का ?
नाही. अाम्ही त्याचे पेटंट घेणार नाही. कारण, हा मानवतेचा प्रश्न अाहे. अाम्ही ही उपचार पद्धती एका पुस्तिकेच्या स्वरूपात देशभरातील एक लाख डाॅक्टरांना उपलब्ध करून देणार अाहाेत.

काेविड- १९ संसर्गातून भारत कधी मुक्त हाेऊ शकताे ?
हे दाेन गाेष्टींवर अवलंबून अाहे. काेविड उपचार पद्धतीचे पालन अाणि लसीकरण. अापल्याला दर महिन्याला २० काेटी लसींची गरज अाहे. परंतु सध्या लस क्षमता ७ ते ८ काेटींपर्यंत गेली अाहे. परंतु स्पुटनिक अाणि अन्य परदेशी लसी येणार अाहेत. त्याच्या मदतीने पुढील महिन्यापर्यंत १५-२० काेटी लसींपर्यंत क्षमता जाईल. जर अापण काेविड उपचार पद्धतींचे पालन केले अाणि महिन्याला २० काेटी लसीकरणाचे लक्ष्य गाठले तर या वर्षाच्या अखेरपर्यंत नियंत्रणात येऊ शकताे.

विषाणू नैसर्गिक अाहे की चीनच्या वुहान प्रयाेगाशाळेतील अाहे? तुम्हाला काय वाटते?
याचे उत्तर देणे माझ्यासाठी कठीण अाहे. परंतु निकाेलस बेलसारख्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने हा विषाणू वुहान प्रयाेगशाळेतून निघाल्याची शंका व्यक्त केली अाहे. हा विषाणू जाणूनबुजून वा अाकस्मिक कारणांमुळे निर्माण हाेऊ शकताे. परंतु या प्रयाेगशाळेची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आम्हाला या प्रकरणी चौकशी आणि पारदर्शकता हवी आहे. अन्यथा भविष्यातील संशोधनासाठी हे अत्यंत कठीण काम असेल.

बातम्या आणखी आहेत...