आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एलिफंट डाॅक्टरच्या नावाने प्रसिद्ध ५९ वर्षांचे डॉ. कुशल कोंवर शर्मा हत्तींवर बोलतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दोन्ही दिसतात. ३५ वर्षे हत्तींची देखरेख आणि उपचारात घालवणाऱ्या डॉ. शर्मा यांनी आसामच्या पुरापासून इंडोनेशियाच्या जंगलापर्यंत हजारो हत्तींचे प्राण वाचवले आहेत.
डॉ. शर्मा सांगतात, पुराच्या वेळी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये अनेकदा तर हत्तीही वाहून जातात. मुले आईपासून दुरावतात. अशा स्थितीत त्यांची देखरेख करण्याची गरज असते. यामुळे पुराच्या काळात मी त्यांची मदत करण्यासाठी तेथे जातो. हत्तींबाबत डॉ. शर्मा सांगतात, हत्ती खूप बुद्धिमान असतात. पूर येण्याचा अंदाज त्यांना सहा-सात दिवसांपूर्वीच येतो. यामुळे बहुतांश हत्ती काझीरंगामधून निघून उंच डोंगराकडे जातात. काही वर्षांपूर्वीपर्यंत पुराच्या आधी काझीरंगातील जवळपास सर्व हत्ती नागालँडमार्गे म्यानमारला जायचे आणि परतताना त्यांची शिकार व्हायची. ही गोष्ट हत्तींच्या लक्षात आल्याने पुराच्या वेळी ते काझीरंगा सोडत नाहीत.
ईशान्य राज्यांतील दाट जंगलात हत्तींवर उपचार करण्यासाठी तीन लाख किमी अंतर पार केलेले डॉ. शर्मा यांनी २० पेक्षा जास्त वेळा आपला जीव धोक्यात टाकला आहे. एकदा तर हत्तीला ट्रँक्युलाइज करण्यासाठी संपूर्ण रात्र झाडावर काढावी लागली होती. १५ वर्षांपासून साप्ताहिक सुटी न घेता १० हजार हत्तींवर उपचार केले आहेत. डॉ. शर्मा सांगतात, मी हत्तींच्या हालचालींवरून त्यांची भाषा समजतो. संकेतात त्यांच्याशी बोलतो. येथील बहुतांश हत्ती मला ओळखतात.
इंडोनेशियात डॉ. शर्मा मॉडेलने होते हत्तींवर देखरेख
डॉ. शर्मा यांनी नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशियातील शेकडो हत्तींवर उपचार केले आहेत. ते सांगतात, इंडोनेशियात नव्वदच्या दशकानंतर हत्तींना जंगलातून पकडून एलिफंट ट्रेनिंग कॅम्पमध्ये ठेवले जाते. तेथे अनेक हत्ती मरायचे. यामुळे त्या लोकांनी मला बोलावले. आजदेखील तेथे हत्तींवर देखरेख मी केलेल्या कॅप्टिव्ह एलिफंट मॅनेजमेंट अँड हेल्थकेअर प्लॅनद्वारे होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.