आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Draupadi Murmu NDA Presidential Candidate | If He Wins, He Will Be The First Tribal President Of The Country| Marathi News

द्रौपदी मुर्मू NDA च्‍या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार:विजयी झाल्‍यास ठरतील देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या आगामी राष्ट्रपतीपदासाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर एनडीएने शिक्‍कामोर्तब केले आहे. मंगळवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्‍ठ नेते उपस्थित होते. मुर्मू 25 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याची शक्‍यता आहे.

द्रौपदी मुर्मूच्या नावाची घोषणा करण्यासोबतच भाजपने त्‍यांच्‍या कर्तृत्वाचा आलेख देखील सांगितला आहे.
द्रौपदी मुर्मूच्या नावाची घोषणा करण्यासोबतच भाजपने त्‍यांच्‍या कर्तृत्वाचा आलेख देखील सांगितला आहे.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, राष्‍ट्रपतीपदासाठी बैठकीत तब्‍बल 20 नावांवर चर्चा झाली. चर्चेअंती पूर्व भारतातील दलित महिलेची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी निवड करण्याचा महत्‍वपूर्ण निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...