आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू आज दाखल करणार अर्ज

नवी दिल्लीएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. त्या शुक्रवारी अर्ज दाखल करतील. पंतप्रधान, संरक्षणमंत्री, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत असतील.

प्रस्तावकांमध्ये ओडिशातील सत्तारूढ बिजू जदचे नेते सस्मित पात्रा यांचेही नाव आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान होईल. विरोधकांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मूंनी दिल्लीत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. आपण सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पाठिंबा मागू, असे मुर्मू यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...