आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशा:तेजसच्या तंत्रज्ञानाद्वारे मिळणार प्राणवायू, लष्करी तंत्रज्ञानाच्या वापरास डीआरडीओने दिली मंजुरी

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवसभरात एका प्लँटमधून होऊ शकते 47 लिटरच्या 60 सिलिंडरची रिफिलिंग

सियाचीनच्या शिखरांवर तैनात जवान, तेजस लढाऊ विमानांचे वैमानिक व कोरोना रुग्णांमध्ये समानता ही आहे की, तिघे ऑक्सिजनच्या टंचाईशी लढतात. ज्या तंत्रज्ञानाद्वारे वैमानिकांना व खूप उंचीवर तैनात जवानांना प्राणवायू दिला जातो तसा सर्वसामान्यांनाही देता येईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हे तंत्रज्ञान नागरी क्षेत्रासाठी खुले केले आहे. ते तयार करणारी डिफेन्स बायो इंजि. अँड इलेक्ट्रो मेडिकल लॅबोरेटरीच्या संपर्कात अनेक खासगी उद्योग आहेत.

तेजसची कॉकपिटच्या हवेला ऑक्सिजनमध्ये रूपांतर करणारी यंत्रणा रुग्णालयांसाठी वरदान ठरू शकते. ही ऑनबोर्ड ऑक्सिजन निर्मिती प्रणाली वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्पासारखी आहे. यातून ऑक्सिजनच्या बाबतीत रुग्णालये आत्मनिर्भर होऊ शकतात. तिचा नागरी वापर करण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ आहेत. ही यंत्रणा मिनिटाला पाच लिटर दराने ६० रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकते. आवश्यकतेनुसार ती कमी-जास्त करता येते. असा प्रकल्प ४७ लिटरचे ६० सिलिंडर एका दिवसात भरू शकतो. तो चोवीस तास चालवता येईल. अरुणाचलच्या तवांग खोऱ्यात २०१७ पासून प्रकल्प सुरू असून त्यातून सैनिकांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जातो.

जेवढी गरज असेल तेवढाच ऑक्सिजन
उंचीवरील भागात वापरला जाणारा सप्लिमेंटल ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टिम घरगुती वापरासाठी उपयुक्त आहे. त्यात ऑक्सिमीटर लावलेले असते आणि रुग्णाला जेवढी गरज असते तेवढाच ऑक्सिजन सिलिंडरमधून येतो. डॉक्टरांच्या देखरेखीची गरज नसते. रुग्णाच्या मनगटावरील पल्स ऑक्सिमीटर पोर्टेबल सिलिंडरशी वायरलेस संपर्कात असते. अशा रुग्णांना जेवढी गरज असेल तेवढाच ऑक्सिजन मिळतो.

बातम्या आणखी आहेत...