आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे भारतीय औषध:दिल्लीतील DRDO च्या कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना सर्वात आधी दिले जाणार 2-DG औषध, लवकर बरे होत आहेत रुग्ण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीला सुधारण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना वेग आणण्यासाठी DRDOने तयार केलेल्या 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज औषधाच्या आपातकालीन मंजुरीनंतर है औषध सर्वात आधी दिल्लीच्या DRDO कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना दिले जाणार आहे.

अधिकाऱ्यांनी सांगिल्यानुसार, एक-दोन दिवसांत हे औषध रुग्णालयात पाठवले जाईल. या औषधाला कोरोनाविरोधात प्रभावी मानले जात आहे. शास्त्रज्ज्ञांनी सांगितले की, हे औषध पाउडर स्वरुपात असून, मागील एका वर्षापासून संशोधन आणि अनेक चाचण्यांच्या आधारावर तयार केले आहे.

DRDO ने डॉ. रेड्डीज लॅबसोबत मिळून हे औषध तयार केले आहे

DRDO च्या लॅबने हैदराबादमधील खासगी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबसोबत मिळून हे औषध तयार केले आहे. क्लीनिकल रिसर्चदरम्यान 2-डीजी औषधाचे 5.85 ग्रामचे पाउच तयार केले आहेत. एक-एक पाउच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिसळून रुग्णांना दिले गेले असून, याचे परिणाम समाधानकारक दिसून आले आहेत. हे औषध दिल्यावर रुग्णांमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. याच आधारावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर दिले जाईल हे औषध
DRDO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशभरातील ज्या 27 हॉस्पिटलमध्ये या औषधाचे अखेरचे ट्रायल्स झाले. तेथून उरलेला स्टॉक गोळा करुन दिल्लीतील DRDO रुग्णालयात पाठवला जाईल. या औषधांना दिल्लीला आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. है औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच दिले जाईल.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, डॉ. रेड्डीज लॅबमध्ये है औषध तयार केले जात आहे. पुढील 10 ते 15 दिवसात कमर्शियल यूजसाठी विविध रुग्णालयात पाठवले जाईल. परंतु, मार्केटमध्ये विकण्यासाठी DCGI कडून परवानगी मिळणे बाकी आहे.

बातम्या आणखी आहेत...