आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DRDO's Anti corona 2DG Drug Launched And Will Be Available In Hospitals From June

कोरोनाचे स्वदेशी औषध:डीआरडीओचे कोरोनारोधी 2 डीजी औषध जूनपासून रुग्णालयांत उपलब्ध होणार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी औषध केले लाँच

संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केलेले कोरोनारोधी औषध २ डीजी जूनपासून सर्व रुग्णालयांत उपलब्ध होईल. सध्या ते अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), डीआरडीओ, लष्कराच्या रुग्णालयातच उपलब्ध आहे. तसेच जेथे खूप आवश्यक असेल तेथे उपलब्ध करून दिले जाईल. डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी सोमवारी ही माहिती दिली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या औषधाची पहिली बॅच वापरासाठी वितरित केली. रेड्डी यांनी सांगितले की, २ डीजीची दुसरी बॅच मेअखेरीस येईल. जूनपासून त्याचे नियमित उत्पादन सुरू होईल. राजनाथ सिंह यांनी सांगितले, कोरोनासोबतच्या लढाईत हा आशेचा नवा किरण आहे. ते भारताच्या शास्त्रीय कौशल्य व क्षमतेचेही उदाहरण आहे. मात्र आपल्याला आता थांबायचे नाही. कारण, दुसऱ्या लाटेबाबत अद्याप काही सांगता येणार नाही.

ऑक्सिजनवरील निर्भरता कमी करेल
औषधाची निर्मिती हैदराबादची डॉ. रेड्डीज लॅब करत आहे. त्याच्या संशोधनातही लॅबचे सहकार्य होते. या औषधाची विशेष गोष्ट म्हणजे ते कोरोनाचे गंभीर आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरता कमी करेल. रुग्णाला दिवसभरात दोन वेळा असे पाच ते सात दिवस द्यावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...