आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • DRDO's New Machine Gun Passes In The Ministry Of Defense Trial, Thid Gun Will Fire 700 Rounds In A Minute

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सशस्त्र दलाला भेट:एका मिनीटाला 700 गोळा झाडणारी DRDO ची नवीन मशीन गन संरक्षण मंत्रालयाच्या ट्रायलमध्ये पास

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 मीटरपेक्षा जास्त दूर मारा करण्यास सक्षम

संरक्षण संशोधन व विकास संस्था(DRDO) ने तयार केलेली नवीन सब-मशीन गन संरक्षण मंत्रालयाच्या ट्रायलमध्ये गुरुवारी पास झाली आहे. यानंतर आता या बंदुकीचा सैन्य, पोलिस आणि सशस्त्र दलात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 5.56x30 mm ची ही बंदुक सेमी ऑटोमेटिक असून, गॅसवर चालते. या बंदुकीतून एका मिनीटात 700 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात.

संरक्षण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, ‘यूजर ट्रायलचा अखेरचा टप्पा सोमवारी संपला होता. टेस्टिंगसाठी सैन्याने जनरल स्टाफ क्वालिटेटिव रिक्वायरमेंट (GSQR)बनवले होते. यात बंदुकीचे परीक्षण गर्मी आणि थंडी असलेल्या भागात करण्यात आले.’

बंदुकीची रेंज काय आहे ?

सब-मशीन गनने 100 मीटरपेक्षा जास्त दूरच्या लक्ष्याचा अचुक नेम धरता येऊ शकतो. या बंदुकीचे वजन फक्त 3 किलो आहे. तसेच, या बंदुकीतून पाठीमागच्या बाजुला कली झटका लागतो आणि याचे बट अॅडजस्टेबल आहे. या बंदुकीला एका हातानेही चालवले जाऊ शकते. या बंदुकीला गृह मंत्रालयाने यापूर्वीच हिरवा कंदील दिला आहे. आता ही बंदुक सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेज आणि इतर पोलिस विभागांना दिली जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser