आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टआरोग्य:उभ्याने पाणी पिल्याने हाडे ठिसूळ होतात, किडनीही निकामी होते; मग पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहान लागल्यावर आपण लगेच ग्लास घेतो किंवा फ्रीजमधील बाटली बाहेर काढतो. त्यानंतर ते पाणी चटकन पिऊन मोकळे होते. कसे - उभ्यानेच...

मुले घाईत असतात, प्रौढ देखील तेच करतात. तुम्ही अनेकदा उभे राहून पाणी न पिण्याचा वडिलधाऱ्यांचा सल्ला ऐकला असेल. यामुळे त्रास होईल, पण त्यामागे काय कारण आहे? याचा कधी विचार केला आहे का?

आज आपण कामाच्या गोष्टीत उभ्याने पाणी पिण्याशी संबंधित प्रश्नांवर उहापोह करू.

प्रश्न: उन्हाळा असो की हिवाळा, बहुतांश लोक उभे राहून पाणी पितात, ते योग्य की अयोग्य?
उत्तरः
ही पद्धत पूर्णतः चुकीची आहे.

प्रश्न: बरं, ही चुकीची पद्धत आहे, तर मग उभे राहून पाणी का पिऊ नये?
उत्तरः नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या संशोधनानुसार,
उभे राहून पाणी पिल्याने आपल्या शरीराला पोषक तत्वे योग्य प्रकारे मिळत नाहीत. कारण अशा प्रकारे पाणी प्यायल्याने तोंडातून पाणी लवकर खाली जाते. त्यामुळे फुफ्फुस व हृदयाला इजा पोहोचते.

याशिवाय अन्न व श्वसन नलिकेतील ऑक्सिजनचा पुरवठाही थांबतो.

प्रश्न : उभे राहून पाणी पिल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
उत्तर :
असे केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आयुर्वेदानुसार त्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही. पण जसजसे वय वाढते तसतसे शरीरात समस्या सुरू होतात.

कोणते आजार होतात, हे खालील ग्राफिकवरून समजून घेऊ.

तुम्ही पण वाचा अन् शेअर करा...

प्रश्‍न : उभे राहून पाणी पिण्याचा पचनसंस्थेशी काय संबंध?

उत्तर: यामुळे, पाणी अन्ननलिकेतून वेगाने खाली जाते. ते थेट पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. यामुळे सभोवतालच्या थरांमध्ये अतिरिक्त दबाव निर्माण होतो. जो धोकादायक आहे. त्यामुळे द्रवपदार्थाचे संतुलन बिघडते. पोटदुखी व अपचनाच्या तक्रारी वाढतात.

प्रश्न: मग त्याचा मूत्रपिंडावर कसा परिणाम होतो?
उत्तरः
नॅशनल लेव्हल मॉनिटरिंगच्या अहवालानुसार, आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी फिल्टर न होता पोटाच्या खालच्या भागाकडे वेगाने जाते. ते पाण्यात साठलेली अशुद्धता पित्ताशयात जमा करते. ते किडनीसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे मूत्रमार्गाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.

प्रश्न : उभे राहून पाणी पिल्याने गुडघ्यांना इजा होते असे बरेच लोक म्हणतात, हे बरोबर आहे का?
उत्तर :
उभे राहून पाणी पिल्यामुळे सांध्यामधील द्रवपदार्थात घट होऊन वेदनांसह अशक्तपणाही येऊ लागतो. हाडे ठिसूळ झाल्यामुळे सांधेदुखी किंवा गुडघेदुखी सारखे आजार होऊ लागतात.

प्रश्न: याचा हृदय, फुफ्फुस व ऑक्सिजनच्या पातळीला कसा परिणाम होतो?
उत्तरः
उभे राहून पाणी पिल्याने आवश्यक पोषक व जीवनसत्त्वे यकृत व पचनसंस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे फुफ्फुस व हृदयाच्या कामावर परिणाम होतो. यामुळे ऑक्सिजनच्या पातळीत बिघाड होतो.

या कारणास्तव, बर्‍याच वेळा, घटाघट पाणी पिल्यास छातीत तीव्र वेदना होतात.

प्रश्‍न : याशिवाय उभे राहून पाणी पिल्याने कोणकोणत्या समस्या होतात?
उत्तर :
असे केल्याने तणावाची पातळीही वाढू शकते. खरे तर आपण उभे राहून पाणी प्यायलो तर त्याचा थेट परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होतो. अशा प्रकारे पाणी प्यायल्याने पोषक तत्व पूर्णपणे निरुपयोगी होतात आणि शरीर तणावाच्या स्थितीत येते.

प्रश्न: पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?
उत्तर :
तज्ज्ञांच्या मते, पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे बसून पिणे. खुर्चीवर बसा, पाठ सरळ ठेवा आणि आराम केल्यावरच पाणी प्या.

प्रश्न : उभे राहून पाणी पिण्याचे तोटे तुम्हाला कळले आहेत, आता बसून पाणी पिण्याचे काय फायदे आहेत?
उत्तरः
हे खालील मुद्यांवरून समजून घेऊ...

  • बसून पाणी पिल्याने ते शरीराच्या सर्व भागांमध्ये चांगले पोहोचते.
  • शरीराला आवश्यक तेवढेच पाणी शरीर शोषून घेते. बाकीचे हानिकारक पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात.
  • असे पाणी पिल्याने हानिकारक पदार्थ रक्तात विरघळत नाहीत. रक्त स्वच्छ राहते.
  • बसून हळूहळू पाणी पिल्याने इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत होते. शरीराला आवश्यक खनिजे मिळतात.
  • पोषक तत्व मेंदूपर्यंत पोहोचतात. यामुळे मेंदूची क्रिया सुधारते.
  • पचनक्रिया सुधारते. पोट फुगण्याची किंवा सूजण्याची समस्या होत नाही.

जाता-जाता

प्रश्न: दूध पिण्याची योग्य पद्धत कोणती?
उत्तर :
दूध उभे राहून प्यावे.

प्रश्न : आता उभे राहून दूध पिण्याचे कारण काय?
उत्तरः
उभे राहून दूध प्यायल्याने ते शरीराच्या सर्व भागांमध्ये सहज पोहोचते व लवकर शोषले जाते. यामुळे शरीराला सर्व पोषक द्रव्ये मिळतात.

दूध थंड, वात व पित्त दोष संतुलित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे बसून दूध पिणाऱ्यांना पचनाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

यामुळेच आयुर्वेदात रात्री झोपण्यापूर्वी किंवा जेवणानंतर 2 तासांनी उभे राहून कोमट दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.

तज्ञ पॅनेल:

  • डॉ. सोनिया रावत, संचालक, प्रतिबंधात्मक आरोग्य विभाग, सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली
  • स्वामी रामदेव, पतंजली योगपीठ, हरिद्वार