आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Driver Beaten With A Hammer In The Name Of Cow Slaughter, One Arrested; Inhuman Attack By Two wheelers In Gurugram

हरियाणा:गोहत्येच्या नावाखाली चालकास हातोड्याने मारहाण, एकास अटक; गुरुग्राममध्ये दुचाकीस्वारांनी केला अमानुष हल्ला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुग्राममध्ये झालेल्या घटनेचा व्हिडिओ जारी झाल्यानंतर पोलिस सतर्क झाले. - Divya Marathi
गुरुग्राममध्ये झालेल्या घटनेचा व्हिडिओ जारी झाल्यानंतर पोलिस सतर्क झाले.
  • व्हिडिओ फुटेज जाहीर झाल्यानंतर पोलिस जागे, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांची गय नाही : पोलिस

हरियाणाच्या गुडगावमध्ये गौहत्येच्या नावाखाली एका पिकअप चालकाला हातोडा व काठीने अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. घटनेचा व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. नूंह निवासी लुकमान गुडगाव मीट मार्केटमध्ये पिकअपने मीट पोहोचवण्यासाठी जात होते. तेव्हा ४-५ दुचाकीस्वार तरुण त्यांचा पाठलाग करत तेथे पोहोचले. पुढे जाऊन आरोपींनी लुकमान यांची गाडी रोखली. त्यानंतर त्यांना मारहाण केली. जमिनीवर आेढत नेले. हे सर्व घडत असताना गर्दीसोबत पोलिसही बघे झाले होते. आरोपींनी आेरडून माझी गाडी रोखली. मी स्वत:च्या सुरक्षेसाठी गाडीचा वेग वाढवला. पुढे सदर बाजारात गाडी थांबवली. तेथे आरोपींनी मला आेढून बाहेर काढले. त्यांनी मला हातोड्याने मारहाण केली. आरोपींनी मला माझ्या गाडीत बसवून अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान रस्त्यात संधी मिळताच भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. भावाने पोलिसांना माहिती दिली.

मीटचा नमुना लॅबमध्ये पाठवला, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांची मुळीच गय करणार नाही : पोलिस

गुडगाव पोलिस आयुक्त के.के. राव म्हणाले, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पिकअप चालकावर उपचार सुरू अाहेत. त्याच्या वाहनातील मीटचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कोणत्याही पाेलिस व अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची सूत्रे एसपी संदीप मलिक यांना सोपवण्यात आली आहे.या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

बातम्या आणखी आहेत...