आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्याच्या विश्वासघातकी ड्रायव्हर:माजी आमदाराची आई 10 हजारांचा चेक द्यायची, ड्रायव्हर शून्य वाढवून 1 लाख रुपये काढायचा; महिलेच्या मृत्यूनंतर 5 लाखांची फसवणूक उघड झाली

जालंधर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 27 ऑक्टोबरला माजी आमदाराच्या आईचे झाले निधन, नंतर स्टेटमेंट पाहिल्यानंतर फसवणूक उघडकीस आली
  • ड्रायव्हरने पोलंडला जायचे कारण सांगत नोकरी सोडली, मात्र गेला नाही

पंजाबच्या जालंधरमधून 5.15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील माजी आमदार अविनाश चंद्र कलेर यांच्या ड्रायव्हरने मोठ्या चलाखीने आपल्या मालकाच्या आईच्या खात्यातून हे पैसे काढले. माजी विधायक आपल्या आईच्या मृत्यूनंतर बँक स्टेटमेंट पाहत असताना हे प्रकरण उघडकीस आले. त्यांनी आपल्या ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अविनाश चंद्र कलेर यांनी पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी त्यांची आई भागदेवी यांचे निधन झाले. अलीकडेच ते आईच्या सिंडिकेट बँकेच्या खात्याचे स्टेटमेंट पाहत होते. त्या खात्यातून मे 2019 ते सप्टेंबर 2019 दरम्यान साडे 5 लाख काढल्याचे समोर आले. परंतु आईला इतक्या पैशांची कधीच आवश्यकता पडली नाही. चेकबुक पाहिले असता रेकॉर्ड पेजवर फक्त 35 हजार रुपये काढल्याचा तपशील भरला होता. पाच वेळा धनादेश भरून पैसे काढण्यात आले. 

आई कमी शिक्षित होती, ड्रायव्हर सर्व कामे करत होता

कलेर यांनी सांगितले की, आई कमी शिक्षित होती. तिला फक्त सही कशी करावी हे माहित होते. आईचे सर्व कामे त्यांचा ड्रायव्हर लखविंदर सिंह करत होते. बँकेतून तीन वेळा एक-एक लाख, एक वेळा 2 लाख आणि एक वेळा 50 हजार रुपये काढले होते. 

चेकवर आधी 10 हजार रु. भरायचा, नंतर शून्य वाढवायचा 

अविनाश यांनी सांगितले की, आरोपी लखविंदरने पोलंडला जात असल्याचे कारण सांगत काम सोडले. मात्र तो गेला नाही. आईने साडे 5 लाख रुपये का काढले याबाबत चौकशी केली असता लखविंदरकडे कोणतेही उत्तर नव्हते. लखविंदरच भागदेवी यांचे पैसे काढण्यासाठी जात होता असे पोलिस तपासात समोर आले. भागदेवी जर 10 हजार रुपये काढण्यास सांगितले तर तो चेकवर त्यांच्यासमोर 10 हजार रुपये भरायचा, मात्र नंतर एक शून्य वाढवत एक लाख रुपये काढायत होता. चेकबुकवर रेकॉर्डच्या पानावर 10 हजार रुपये लिहीत होता. 

बातम्या आणखी आहेत...