आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Drop Out Youth Will Be Identified And Linked To Education, A Database Of Volunteers Of Different Schemes Will Be Created.

राष्ट्रीय युवा धोरण:ड्रॉप आऊट युवांची ओळख पटवून शिक्षणाशी जोडणार, वेगवेगळ्या योजनांच्या व्हॉलिंटियर्सचा डेटाबेस तयार होणार

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण-२०२१ चा मसुदा जारी करून हितधारकांच्या शिफारशी, दृष्टीकोन आणि मत मागवले आहे. धोरणात तरुणाईची क्षमता विकसित करण्यासाठी १० वर्षांचा आराखडा सादर केला आहे. यामध्ये शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता, नेतृत्व विकास, आरोग्य व क्रीडा तसेच सामाजिक न्याय-प्राधान्य निश्चित केले आहेत. या मसुद्यावर १३ जूनपर्यंत मत व्यक्त करू शकता.

देशात २९ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणाईची लोकसंख्या सुमारे ३४% आहे. २०३० पर्यंत ती २४% राहील. मसुद्यात ६ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर दिला आहे. १० वीच्या विद्यार्थ्यांना आयटीआय व सेक्टर स्किल काउन्सिलच्या मदतीने ट्रेड स्पेशलायजेशन कोर्स करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे, एका व्होकेशनल कोर्सने जोडले जाईल. ११ वी-१२ वीच्या विद्यार्थ्यांना व्होकेशनल अॅप्रेंटिसची सुविधा देण्याची तरतूद आहे. ड्रॉपआउट आणि नीट युवाची(यूथ नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग) ओळख करून डेटा एकत्र केला जाईल. यामुळे त्यांना नव्याने शिक्षणाच्या प्रवाहात आणता येऊ शकेल. व्होकेशनल ट्रेनिंगदरम्यान व्यवस्थित निगराणी होईल, यामुळे त्यांना प्रशिक्षणानंतर रोजगार मिळू शकेल. मसुद्यात नमूद केले की, ८०% नोकऱ्या असंघटित क्षेत्रात मिळतात. त्यात नव्या उभरत्या गिग इकॉनॉमीच्या हिशेबाने तरुणाईला तालुका पातळीवर कौशल्य प्रशिक्षणाचा आराखडा विकसित होईल. मशीन लर्निंग, रोबोटिक्स, एआय व ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या कौशल्य प्रशिक्षणाला प्राधान्य दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...