आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना औषधांचा अवैध साठा:गौतम गंभीर फाउंडेशनवर लागले फॅबीफ्लू औषधे बेकायदा जमा केल्याचे आरोप; ड्रग कंट्रोलर करणार कारवाई

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गंभीर म्हणाला- अखेरच्या श्वासापर्यंत दिल्लीची सेवा करेन

माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांच्या फाउंडेशनवर कोरोना औषधांचा अवैधरित्या साठा केल्याप्रकरणी कारवाई होणार आहे. हायकोर्टात ड्रग कंट्रोलरने ही माहिती दिली. गौतम गंभीर फाउंडेशनवर कोरोना उपचारात वापरले जाणारे फेबीफ्लू औषध जमा करुन रुग्णांना वाटल्याचा आरोप आहे.

गौतम गंभीरने एप्रिल महिन्यात एक ट्वीट केले होते. त्यात गंभीरने म्हटले होते की, मेडिकल डॉक्यूमेंट्स आणि आधार कार्ड दाखवून रुग्ण कार्यालयातून फेबीफ्लू औषध घेऊन जाऊ शकतात. गंभीरशिवाय आम आदमी पक्षाच्या आमदार प्रिती तोमर आणि प्रवीण कुमारनेही कोरोना औषधं आणि सिलेंडर जमा केले होते. त्या वेळेस देशभरात कोरोना औषधांची आणि ऑक्सिजन सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणता होती. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने ड्रग कंट्रोलरला तपास करण्याचे आदेश दिले होते.

गंभीर म्हणाले- अखेरच्या श्वासापर्यंत दिल्लीची सेवा करेन
गौतम गंभीर यांनी त्यावेळेस म्हटले होते की, अभिनेता अक्षय कुमारकडून त्यांच्या फाउंडेशनला एक कोटी रुपयांचे डोनेशन मिळाले आहे. या पैशातून कोरोना रुग्णांची सेवा करेन. जेव्हा हायकोर्टात हे प्रकरण पोहोचले, तेव्हा कोर्टाने दोन गोष्टींवर नाराजी व्यक्त केली. पहिली- गंभीर यांना क्लीन चिट देण्यावर आणि दुसरी- गंभीरच्या वक्तव्यावर, ज्यात त्यांने म्हटले की, पुन्हा असे करणार अखेरच्या श्वासापर्यंत दिल्लीची सेवा करेन.

ड्रग कंट्रोलरने फाउंडेशनला नोटिस पाठवून उत्तर मागितले

ड्रग कंट्रोलरने आपल्या चौकशीनंतर म्हटले होते की, गंभीर फाउंडेशनने 2349 फेबी फ्लूच्या स्ट्रिप खरेदी केल्या आहेत. याशिवाय, 120 ऑक्सिजन सिलेंडरही घेतले. या औषधांचे मोफत रुग्णांना वाटप करण्यात आले. या घटनेनंत रगंभीर फाउंडेशनला नोटिस पाठवून संबंधित प्रकारावर स्पष्टीकरण मागितले होते.

बातम्या आणखी आहेत...