आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Drugs Controller General Of India (DGCI) । Approves Emergency Use For Zydus Cadila's । Pegylated Interferon Alpha 2b, ‘Virafin’

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेड इन इंडिया औषधाला मंजुरी:झायडसच्या वीराफिनला ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

अहमदाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीचा दावा- या औषधामुळे शरीरातील ऑक्सीजनची पातळी वाढेल

अहमदाबादमधील फार्मा कंपनी झायडस कॅडिलाच्या पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2b, वीराफिन (इंजेक्शन) औषधाला कोरोना रुग्णांना देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडून शुक्रवारी मंजुरी मिळाली आहे. या औषधामुळे सात दिवसात आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

यापूर्वी कंपनीने दावा केला होता की, त्यांच्या क्लीनिकल ट्रायल्समध्ये या औषधाचा 91% परिणाम दिसला आहे. या औषधामुळे ऑक्सीजनची पातळीदेखील वाढते. कंपनीचे म्हणने आहे की, त्यांनी कोविड-19 इंफेक्टेड रुग्णांवर पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2b, वीराफिन औषधाचे क्लीनिकल ट्रायल केले. क्लीनिकल ट्रायल्स रजिस्ट्रीवरील कंपनीच्या डॉक्यूमेंट्सनुसार, औषधाचा परिणाम जाणून घेण्यासाठी ट्रायल्स डिसेंबर 2020मध्ये सुरू केले होते. 250 रुग्णांना या ट्रायल्समध्ये सामील केले होते.

हेपेटाइटिस B आणि C रुग्णांवर झाली आहे चाचणी

पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2b थेरेपी नवीन औषध नसून, 2011 मध्ये हेपेटाइटिस C साठी वापरण्यात येणारे औषध आहे. तेव्हापासून या औषधामुळे अनेक क्रॉनिक हेपेटाइटिस B आणि C रुग्णांवर उपचार केले जातात.

बातम्या आणखी आहेत...