आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Drugs Gujarat । Gujarat ATS Seizes Rs 600 Crore Worth Of Heroin; Drugs Were Found For The Second Time In A Week

गुजरातमध्ये ड्रग्जची मालिका सुरूच:गुजरात एटीएसची मोठी कारवाई, 600 कोटींचे हेरॉईन जप्त; आठवड्याभरात दुसऱ्यांदा ड्रग्ज सापडले

मोरबी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये एटीएसचीने मोठी कारवाई केली आहे. मोरबी जिल्ह्यातील जांजुरा या गावामधून तब्बल 120 किलोल हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याची किंमत अंदाजे सहाशे कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी गुजरात एटीएसने दोन जणांना अटक केली आहे.

राज्याचे मंत्री हर्ष सांगवी यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकतेच मागील आठवड्यात गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. त्यापूर्वी महिनाभर आधी तब्बल नऊ हजार रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.

9 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
महिन्याभरापूर्वी गुजरातमध्ये आदानी समूहाकडे मालकी असलेल्या कच्छ भागातील मुंद्रा पोर्टवरून तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत अंदाजे नऊ हजार कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमधून या ड्रग्जची तस्करी करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ड्रग्जची तस्करी होत असल्याचे समजते. पोलिसांकडून सापळा रचून कारवाई केली जात आहे. मुंबईनंतर गुजरातमध्ये ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गुजरात एटीएसची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...