आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Drunken Passenger's Suspicion Of Female Co passenger In New York Delhi Flight Is A Shocking Incident

मद्यधुंद प्रवाशाची महिला सहप्रवाशावर लघुशंका:न्यूयॉर्क-दिल्ली विमानात घडला संतापजनक प्रकार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नशेतील एका व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याच्या घटनेचा अहवाल हवाई वाहतूक प्राधिकरणाने (डीजीसीए) एअर इंडियाकडून मागवला आहे. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात घडली होती. एअर इंडियाने चौकशी आणि योग्य कारवाईसाठी समिती स्थापन केली आहे. सध्या आरोपी प्रवाशावर एक महिन्याच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. दोषी आढळल्यास आणखी कारवाई केली जाईल. प्रकरणाची माहिती पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

बंगळुरू विमानतळावर महिलेचे शर्ट उतरवले बंगळुरू |बंगळुरू विमानतळावर तपासणीवेळी शर्ट उतरवल्याचा आरोप एका महिला संगीतकाराने केला आहे. सुरक्षा चौकीवर केवळ कॅमिसोल (अंडरगार्मेंट्स) घालून उभे राहणे अत्यंत अपमानकारक आहे, असे तिने म्हटले आहे. दरम्यान, बंगळुरू विमानतळ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...