आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Dry Run Of Corona Vaccination Will Be Held In Each District On January 8 In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:8 जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यात होणार लसीकरणाचा ड्राय रन, उद्या राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 1 कोटी पार, भारत टॉप-10 संक्रमित देशांच्या यादीतून बाहेर

देशात पुढील आठवड्यापासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. तत्पूर्वी 8 जानेवारी रोजी देशभराड्राय रन सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, देशातील प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन करण्याचा उद्देश लसीकरणादरम्यान येणाऱ्या अडथळे ओळखणे आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन लसीकरणापूर्वी गुरुवारी सर्व राज्यांच्या आणि UT च्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

लसीकरणाचा पहिला ड्राय रन 28-29 डिसेंबर रोजी चार राज्यांच्या दोन-दोन जिल्ह्यांत झाले होते. दुसरा ड्राय रन 2 जानेवारी रोजी देशभरातील 116 जिल्ह्यांत करण्यात आला होता. आता तिसऱ्या ड्राय रनमध्ये देशभरातील सर्व जिल्ह्यांचा समावेश होणार आहे.

दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने एका उच्च स्तरीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि अनेक मोठ्या डॉक्टरांचा समावेश असणार आहे. केरळमध्ये मागील 7 दिवसांत 35 हजार 38 नवीन रुग्ण आढळले. येथे आता दररोज 5 हजार लोक पॉझिटिव्ह आढळत आहेत.

भारत जगभरातील टॉप-10 संक्रमित देशांच्या यादीतून बाहेर

कोरोनाबाबत दिलासादायक बातमी आहे. भारत आता जगभरातील टॉप-10 संक्रमित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. सध्या देशात 2.22 लाख अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत भारत 10 व्या स्थानावर होता. तर पोलंड 11 व्या क्रमांकावर होता.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 1 कोटी पार

देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 1 कोटी पार झाला आहे. मंगळवारी 17 हजार 909 रुग्ण आढळले, 21 हजार 161 बरे झाले तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात सध्या 2.22 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या 1.03 कोटी झाली आहे. 1 कोटी 3 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशात कोरोनामुळे 1.50 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

बातम्या आणखी आहेत...