आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DST Secretary Prof. Ashutosh Sharma Said By December, Herd Immunity Will Be Develop In The Country, 70% Of The Population Will Become Anti Body; Transmission Of Infection Will Also Slow Down

कोरोनावर एक्सपर्ट्सचा दावा:IIT चे सीनियर प्रोफेसर म्हणाले - डिसेंबरपर्यंत देशात हर्ड इम्यूनिटी येणार, 70% लोकसंख्येत अँटीबॉडी तयार होतील

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 2.46 कोटी लोक संक्रमित झाले

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (DST)चे सेक्रेटरी आणि IIT कानपूरचे सीनियर प्रोफेसर डॉ. आशुतोष शर्मा म्हणाले की, डिसेंबरपर्यंत देशात हर्ट इम्यूनिटी तयार होईल. तेव्हा 60 ते 70% लोकसंख्येत अँटीबॉडी डेव्हलप होतील. यामुळे संक्रमणाच्या ट्रान्समिशनचा वेग खूप कमी होईल. प्रो. शर्मा म्हणाले की, जर सर्व काही नियोजनानुसार सुरू राहिले तर देश लवकरच महामारीवर विजय मिळवेल.

भविष्य आपल्या वर्तनावर अवलंबून असेल
प्रो. शर्मा म्हणाले की परिस्थिती अशी आहे की लसीकरणानंतरही लोकांना मास्क घालावे लागतील. सध्या, विषाणूचे वेगवेगळे म्यूटेंट येत आहेत. मागच्या लाटेमध्ये एक्सपर्ट्स आणि प्लानिंग कमिटीला याचा अंदाज घेता आला नाही. म्हणूनच दुसरा टप्पा अधिक धोकादायक बनला आहे. आता आपण सर्वांनी भविष्यासाठी सावध राहिले पाहिजे. आपले भविष्य आपल्या वर्तनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. मास्क, सोशल डिस्टेंसिंग, लसीकरणाची भूमिका खूप जास्त आहे.

24 तासांमध्ये 3.10 लाख कोरोना रुग्ण आढळले
गेल्या 24 तासांच्या आत देशात 3.10 लाख लोकांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. हा आकडा गेल्या 25 दिवसांमध्ये सर्वात कमी आहे. यापूर्वी 20 एप्रिलला 2.94 लाख नवीन संक्रमित आढळले होते. खरेतर मृतांचा आकडाही चिंता वाढवत आहे. देशात शनिवारी कोरोनामुळे 4,075 लोकांनी जीव गमावला. ही मेमध्ये 6 वी वेळ आहे, जेव्हा एका दिवसात 4 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक गोष्ट म्हणजे कोरोनातून रिकव्हर होणाऱ्या लोकांचा आकडा सातत्याने वाढत आहे. काल एकूण 3.62 लाख लोकांनी कोरोनाला मात दिली. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असेलल्या रुग्णांच्या संख्येत 55,931 ची घट झाली आहे. ही या वर्षी अॅक्टिव्ह केसमध्ये होणारी सर्वात मोठी घट आहे.

आतापर्यंत 2.46 कोटी लोक संक्रमित झाले
देशात आतापर्यंत एकूण 2.46 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 2.07 कोटी लोक बरे झाले आहेत. तर 2.70 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 36.13 लाख रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...